मुंबई :अनिल अंबानी यांच्या कर्जबाजारी कंपनीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बोली प्रक्रियेची दुसरी फेरी पार पडली असून कधीकडली भारताचे अतिश्रीमंत असलेल्या अनिल अंबानींची कंपनी खरेदी करण्याच्या शर्यतीत अनेक बोलीदार सामील होते, परंतु हिंदुजा समूहाने रिलायन्स कॅपिटलसाठी एकमेव बोली सादर केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. कर्जबाजारी कंपनी रिलायन्स कॅपिटलच्या विक्रीसाठी आयोजित लिलावाच्या दुसऱ्या फेरीत हिंदुजा समूहाची कंपनी ९,६५० कोटी रुपयांच्या बोलीसह विजेती ठरली आहे.

हिंदुजा समूहाच्या या कंपनीचे नाव इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने बुधवारी २६ एप्रिल रोजी ही माहिती दिली. अहवालानुसार इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड (IIHL) ऑनलाइन लिलावाच्या दुसऱ्या फेरीत ९,६५० कोटी रुपयांच्या बोलीसह सर्वाधिक बोली लावणारी होती.

मुंबई इंडियन्सच्या बॉसची कमाई मुकेश अंबानींपेक्षा मोठी; किती कमावतात? माहित्येय का?
लिलावाच्या पहिल्या फेरीत टोरेंट इन्व्हेस्टमेंटची सर्वात मोठी बोली
लिलावाच्या पहिल्या फेरीत टोरेंट इन्व्हेस्टमेंटने लावलेल्या ८,६४०कोटी रुपयांच्या बोलीपेक्षा ही बोली रक्कम सुमारे १,००० कोटी रुपये जास्त आहे. या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की लिलावाच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्याचा इरादा व्यक्त करणाऱ्या टोरेंट इन्व्हेस्टमेंट्स आणि सिंगापूरची ओक्ट्री या दोन कंपन्यांनी बोली प्रक्रियेत भाग घेतला नाही.

हिंदुजा ग्रुपकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रिलायन्स कॅपिटलच्या कमिटी ऑफ क्रेडिटर्स (CoC) ने लिलावाच्या दुसऱ्या फेरीसाठी १०,००० कोटी रुपयांची मूळ किंमत निश्चित केली होती. त्याच वेळी लिलावाच्या पहिल्या फेरीसाठी किमान बोली ९,५०० कोटी रुपये निश्चित करण्यात आली होती.

मुकेश अंबानींकडून ‘राईट हँड’ला खास गिफ्ट; तब्बल १५०० कोटींची बिल्डिंग भेट; कारण काय?
बोली प्रकरणाचा निकाल न्यायालयात प्रलंबित
अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की आयआयएचएलने ९,६५० कोटी रुपयांची संपूर्ण रक्कम रोख स्वरुपात देण्याचे सांगितले आहे. सीओसीने किमान ८,००० कोटी रुपयांचे आगाऊ पैसे रोखीने देण्याची तरतूद केली होती. सुप्रीम कोर्टाकडून पुन्हा लिलावाला मंजुरी मिळाल्यानंतर बुधवारी बोलीची दुसरी फेरी पार पडली. मात्र या बोली प्रक्रियेचा निकाल न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असेल.

खरेतर पहिल्या फेरीतील लिलावात सर्वाधिक बोली लावणाऱ्या टोरेंटने नंतर सुधारित बोली सादर केल्याचा आरोप करत आयआयएचएलला न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर सुप्रीम कोर्टाने दुसऱ्या फेरीच्या बोलीचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणाची पुढील सुनावणी ऑगस्टमध्ये होणार आहे.

रिलायन्स कम्युनिकेशन्सचे रिलायन्स जिओत विलीनीकरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here