नवी दिल्ली :आपलं स्वतःच घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि हे पूर्ण करण्यासाठी लोक आयुष्यभर पैसे जोडत राहतात. बरीच लोक आधीच तयार केलेल्या घरात राहण्यास पसंत करतात विशेषतः शहरात अपार्टमेंट आणि सोसायटी कल्चर आल्याने ग्राहक बांधलेले फ्लॅट घेण्यास प्राधान्य देऊ लागले आहेत. मात्र, त्यानंतरही प्लॉट विकत घेऊन स्वत: घर बांधण्यास प्राधान्य देणारी लोकसंख्या मोठी आहे. मात्र, आजच्या महागाईच्या काळात घर बांधण्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. वीट, वाळू, रीबार, गिट्टी, रंगापासून लेबर चार्जेसपर्यंत घराच्या बांधकामाचा खर्च गेल्या काही वर्षांत अनेक पटींनी वाढला आहे.

अशा स्थितीत जर तुम्ही घर बांधण्याची तयारी करत असाल तर काही गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही खर्च निम्म्याने कमी करू शकता. बांधकामाच्या कामासाठी पावसाळा चांगला मानला जात नाही, पण त्यातून पैसे वाचले तर काय वाईट. यासोबत काही छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्यास गुणवत्तेशी तडजोड न करता घर बांधताना लाखो रुपयांची बचत होऊ शकते.

घर खरेदी करणं आता सुलभ होणार, बिल्डर-ग्राहकांमधील वाद लवकरच मिटणार! वाचा सविस्तर
नकाशाशिवाय घर बांधू नका
गवंडीवर विश्वास ठेवून घर बांधणी सुरू करू नका. योग्य नकाशा (प्लॅन) तयार केल्यानंतरच घर बांधण्यास सुरुवात करा. यामुळे तुमचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच नंतर कोणतीही तोडफोड होणार नाही.

कुशल गवंडी आणि कंत्राटदार नियुक्त करा
घरे बांधणी सुरु करण्यापूर्वी केवळ कुशल गवंडी आणि कंत्राटदार नियुक्त करा. कुशल गवंडी बांधकाम खर्च कमी करण्यास मदत करतो तसेच कच्चा माल वाया देखील घालवत नाही. एक कुशल गवंडी तुम्हाला तुमची एकूण बांधकाम किंमत १०% पर्यंत कमी करण्यात मदत करतो.

फ्लॅटसोबतच्या सुविधांवर १८ टक्के जीएसटी नको, गृह खरेदीदारांना दिलासा
फ्लाय-एश विटा किंवा ब्लॉक वापरा

घरे बांधण्यासाठी मातीच्या विटांऐवजी फ्लाय ॲश विटांचा वापर करा, जी तुम्हाला ७-१० रुपयांना मिळते, तर पारंपारिक वीटासाठी तुम्हाला प्रति वीट १० ते १२ रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे फ्लाय-एश विटा किंवा ब्लॉक्सपासून बनवलेल्या भिंतीला प्लास्टर करण्याची आवश्यकता नाही. परिणामी मजुरीचा खर्चही वाचतो. तसेच साहित्याचा खर्चही कमी होतो. त्यापासून बनवलेल्या भिंतीवर पोटीन लावून तुम्ही ते रंगवू शकता. त्यामुळे प्लास्टर आणि मजुरीचा खर्च दोन्ही वाचतो. त्यामुळे खर्च कमी होण्यास मदत होते.

प्लॅनमध्ये बदल करू नका!
घराचा प्लॅन तयार झाला की, त्यानुसार घर बांधणी सुरू करा आणि नंतर पुन्हा-पुन्हा बदल करण्याचे टाळा. हे तुमचा बांधकाम खर्च आणि मजुरीचा खर्च वाढवण्यासाठी काम करेल.

जोपर्यंत अयोध्येत मंदिर उभारणार नाही तोपर्यंत ‘राम’ नाम लिहितच राहणार

साहित्य वाया घालवणे कमी करा
घर बांधताना विटा, वाळू, गिट्टी, सिमेंट आदींचा अपव्यय होतो. कंत्राटावर काम दिल्यावर गवंडी त्याचा बराचसा अपव्यय करतात. यामुळे बांधकाम खर्च १५% पर्यंत वाढतो. अशा स्थितीत तुम्ही याकडे लक्ष देऊन आपण खर्च कमी करू शकता.

घाऊक दुकानातून खरेदी करा
संशोधनाशिवाय कधीही बांधकाम साहित्य खरेदी करू नका. तुमच्या शहराच्या आसपासच्या मोठ्या दुकानांमधून दर मिळवा. तसेच ऑनलाइन संशोधन करा. त्यानंतरच खरेदी करण्याचा निर्णय घ्या. हे तुम्हाला मोठी बचत करण्यात मदत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here