मुंबई : बजाज फायनान्स लिमिटेड या बजाज फिनसर्व्हच्या कर्ज आणि गुंतवणूक विभागाने सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅन (एसडीपी)अंतर्गत नवी ही योजना सादर केली आहे. सिंगल मॅच्युरिटी स्कीममध्ये ठेवीदारांना सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅन (एसडीपी)सह काळाच्या ओघात जमा केलेल्या गुंतवणुकीवर एकाच दिवशी मॅच्युरिटीचे सर्व लाभ मिळतील. ठेवीदारांना दरमहा ५००० रुपये या नुसार मासिक ठेवीसह ही पुंजी जमा करता येईल.

या योजनेचा वापर करणाऱ्या ठेवीदारांना १२ ते ६० महिन्यांचा कालावधी निवडता येईल आणि दरमहा शुल्लक रकमेतून एक मोठा निधी जमा करता येईल. ठेवीदारांना संपूर्ण कालावधीसाठी एकच व्याजदर न घेता प्रत्येक ठेवीच्या तारखेला असलेल्या व्याजदराचा लाभ घेता येईल. पहिल्या ठेवीसाठी ठराविक कालावधी निश्चित झाला की, त्यापुढील सर्व ठेवींसाठीचा कालावधी नियंत्रित करून सर्व रक्कम एकाच दिवशी मिळेल, अशी सोय केली जाईल. तरुण गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायची असते आणि त्यांच्याकडे फारशी रोख रक्कम नसते. अशासांठी ही योजना अगदी योग्य आहे. सिंगल मॅच्युरिटी स्कीम ही योजना नियमित बचत करणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. त्यांना मासिक बचतीवरही खात्रीशीर परतावा यातून मिळेल, असे मत बजाज फायनान्स लिमिटेडच्या रीटेल अॅण्ड कॉर्पोरेट लायबिलिटीजचे चीफ बिझनेस ऑफिसर सचिन सिक्का यांनी व्यक्त केले.

योजनेतील लाभ– सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅनचा एक प्रकार असलेल्या सिंगल मॅच्युरिटी स्कीममध्ये मासिक ठेवीवर खात्रीशीर परतावा मिळतो. त्याचप्रमाणे नकारात्मक परताव्याचा धोका टाळून यात सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी)चे लाभ आणि सोयीस्करपणाही मिळतो.

– याआधी सादर करण्यात आलेल्या मंथली मॅच्युरिटी स्कीम या सिस्टमॅटिक डिपॉझिट प्लॅनच्या प्रकाराप्रमाणेच या योजनेतही कोणत्याही प्रकारचे बाऊन्स चार्जेस नाहीत. ठेवीदारांना मासिक ठेवीचे पैसे भरले नाहीत तरी यात दंड आकारला जात नाही.

– पहिले पेमेंट चेक किंवा ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे. त्यानंतरच्या ठेवींची रक्कम एनएसीएच निर्देशांनुसार ठेवीदाराच्या बँक खात्यातून थेट वजा केले जातील. पहिली ठेव विशिष्ट कालावधीसाठी बुक झाली की सर्व ठेवी एकाच दिवशी मॅच्युअर होतील याप्रमाणे पुढील ठेवींचा कालावधी ठरवला जातो.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here