सातारा : बोलेरो पिकअप गाडीच्या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. म्हसवड येथील ऑटोमोबाईल व्यापारी प्रकाश गायकवाड आणि त्यांचा मुलगा राहुल (वय १०) या अपघातात जखमी झाले आहेत, तर प्रकाश यांच्या पत्नीचा दुर्देवी मृत्यू झाला. सुवर्णा गायकवाड (वय ३२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात म्हसवड – माळशिरस रस्त्यावर श्रीनाथ हॉटेलच्या समोर झाला.बहिणीला भेटून म्हसवड येथे परतणाऱ्या भावाच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गाडीला झालेल्या अपघातामध्ये सुवर्णा प्रकाश गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना येथील माळशिरस चौकानजीक घडली.

याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन आणि घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बहिणीला भेटून म्हसवड येथे परतणाऱ्या प्रकाश गायकवाड यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातला. या अपघातामध्ये सुवर्णा प्रकाश गायकवाड (वय ४८) यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर प्रकाश गायकवाड (वय ५२) आणि त्यांचा मुलगा राहुल (वय १४) गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना येथील माळशिरस चौकानजीक घडली आहे.

शतपावलीसाठी गेली, रस्त्यावर बाईकची जोरदार धडक; महिलेच्या मृत्यूने परिसरात हळहळ
प्रकाश गायकवाड दुचाकी (क्र. एमएच ११ सीएल ८३०६) वरून बहिणीकडे इंदापूर येथे भेटण्यासाठी गेले होते. तेथील काम आटोपून ते पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून सायंकाळी म्हसवड येथे येत होते. त्यावेळी दुचाकी माळशिरस चौकातील पेट्रोल पंपानजीक आली. येथे श्रीनाथ हॉटेलच्यासमोर बुलोरो पिकअपने (एमएच ४५ एएफ १९६०) दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यात सुवर्णा प्रकाश गायकवाड यांचा मृत्यू झाला. तर प्रकाश गायकवाड आणि राहुल हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

बोरघाटातील अपघातातून बचावलेल्या मुलाला पाहताच आईच्या अश्रूंचा बांध फुटला

या घटनेची फिर्याद ॲड. विलास माणिकराव गायकवाड यांनी दिली आहे. अधिक तपास सपोनी राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस. एस. जाधव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here