इम्रान आणि नोमाननं केलेल्या मारहाणीनंतर मोतीच्या तोंडातून रक्त येऊ लागलं. देवेंद्रच्या कुटुंबातील महिलांनी इम्रान आणि नोमान यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघांनी त्यांनादेखील जखमी केलं. घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यात दोन्ही तरुणांच्या हातात मोठ्या काठ्या दिसत आहेत. देवेंद्र यांच्या कुटुंबातील महिला आक्रोश करताना पाहायला मिळत आहेत.
घटनेनंतर दोन्ही बाजूंनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पिटबुल आमच्या मुलीवर भुंकतो, असं हल्लेखोर आरोपींनी तक्रारीत नमूद केलं आहे. तर देवेंद्रच्या पत्नी रानी यांनी इम्रान आणि नोमानवर आरोप केले आहे. घराचं काम सुरू असल्यानं मोती बाहेर होता. शेजारी राहणारी मुलगी जवळच खेळत होती. मोती तिच्यावर भुंकू लागला. त्यामुळे मोतीला आत आणून ठेवलं. त्यानंतर आरोपींनी त्याच्यावर घरात शिरुन हल्ला केला. माझ्या नणंदेलादेखील मारहाण केली, असं रानी यांनी पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
आरोपींनी केलेल्या मारहाणीत मोतीचं जखमी झाला. त्याचं बरंच रक्त गेलं. त्याचा जबडा तुटला. आठ दात तुटले. त्याच्या उपचारांसाठी आम्ही बरीच धावाधाव केली. नोएडातील हाऊस ऑफ स्ट्रे ऍनिमल डिस्पेंसरीत त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यासाठी ७० हजार रुपयांचा खर्च आला, असं रानी यांनी सांगितलं.