मंचर, पुणे :आतापर्यंत आपण मुलं पळाली, प्रेमी युगुल पळालं, यासारख्या घटना पहिल्या असतील. मात्र बैलगाडा शर्यतीच्या घाटातून चक्क बैल पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. बैलगाडा घाटातून सोन्या नावाच्या बैलाने पळ काढला असल्याचे पहायला मिळाले आहे. मालकाने त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो कुठेही सापडला नाही. त्यामुळे बैलाच्या मालकाने थेट त्याचा शोध घेण्यासाठी मंचर पोलिसात बैल हरवल्याची फिर्याद दाखल केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अनंता तुकाराम पोखरकर यांनी आपला ‘सोन्या’ आणखी तीन बैलांसोबत गाडा पळविण्यासाठी घाटात वाजत गाजत आणला होता. सोन्या हा घाटात पळण्यात मोठा तरबेज होता. परिसरात देखील त्याची चांगलीच चर्चा असते. तो बैलगाडा घाटात आल्यावर प्रेक्षकांनी देखील त्याला तेवढाच प्रतिसाद दिला. सोमवारी दुपारी बैलगाडा शर्यतीसाठी त्याला गाड्याला जोडत असताना त्याने हिसका मारला आणि त्याने घटनास्थळावरून पळ काढला. गेल्या दोन दिवसांपासून मालकाने त्याचा शोध घेतला, मात्र तो कुठेही सापडलेला नाही.
अखेर मालकाने त्याचा शोध घेण्यासाठी मंचर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मंचर पोलिसांनीही बैलाच्या शोधासाठी शोध मोहीम आखली आहे. तसेच या शोध मोहिमेत बैलगाडा मालकही सहभागी झाले आहेत. मात्र सोन्या बैल हरविल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे.
अखेर मालकाने त्याचा शोध घेण्यासाठी मंचर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. मंचर पोलिसांनीही बैलाच्या शोधासाठी शोध मोहीम आखली आहे. तसेच या शोध मोहिमेत बैलगाडा मालकही सहभागी झाले आहेत. मात्र सोन्या बैल हरविल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली आहे.
हॉर्नच्या आवाजाने नदीत उडी मारली अन् बैल मगरींच्या तावडीत सापडला, पाहा सुटकेचा थरार
सोन्या बैलाचे वर्णन –
वय दोन वर्ष, पाच फूट उंची, फिक्कट काळा पांढरा वर्ण (कोसा रंग) आहे. इतर प्राण्यांवर व मनुष्यावर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्णनाचा बैल आढळून आल्यास मंचर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक (०२१३३) २२३१५९ येथे किंवा बैलगाडा मालक अनंत पोखरकर यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन मंचर पोलिसांकडून करण्यात आले आहे.