याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कुणाल चौधरी आणि फिर्यादी यांचा २ एप्रिल २०२२ रोजी साखरपुडा झाला. यानंतर आरोपीने फिर्यादीला जबरदस्तीने महाबळेश्वर येथे फिरायला नेले. त्यानंतर तिच्या मनाविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले.
त्यानंतर आरोपी आणि त्याचे वडील संतोष चौधरी यांनी तिचा विश्वास संपादन करून शेअर मार्केटमध्ये घेतलेले पैसे फेडण्याकरता कर्ज काढायला लावले. त्यानंतर पिंपरी येथील संत तुकाराम नगर येथील फिर्यादीच्या घरून सुमारे ५लाख २२ हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने घेऊन फिर्यादीची फसवणूक केली.
नात्यातल्या मुलासोबत १९ वर्षीय तरुणीचे शारीरिक संबंध, स्वछतागृहात बाळाला जन्म देऊन कमोडमध्ये फेकलं!
पैसे परत न करता किरकोळ कारणावरुन तिच्याशी भांडणे करण्यास सुरुवात केली. तिच्यावर संशय घेत तुझ्याकडून फक्त पैसे घेण्याकरिता लग्न जमावले होते, असे सांगत आरोपीने मी तुझ्याशी लग्न करणार नाही, परत जर पैसे मागायला आलीस तर तुला आणि तुझ्या घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी देत फसवणूक केली आहे.
यानंतर महिलेने पोलिसात धाव घेत आरोपी बाप लेकविरोधत फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी गुन्हा दखल केला असून दोन्ही आरोपींचा शोध सुरू आहे.