कोल्हापूर: सरकार सीमाभागातील मराठी माणसांचा किती द्वेष करते, याचं आणखी एक संतापजनक उदाहरण समोर आलं आहे. जिल्ह्यातील एका गावात तेथील नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. (Shivaji Maharaj’s Statue removed by Government)

मनगुत्ती गावात ही घटना घडली आहे. रात्रीच्या अंधारात पुतळा हटवल्याचा गावकऱ्यांनी तीव्र निषेध केला असून तिथे मनगुत्ती गावात तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिवभक्त उद्या कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वाचा:

ग्रामपंचायतीच्या परनावगीनं मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा हटवण्यात यावा यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. त्याविरोधात मनगुत्ती येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली होती. मात्र, कर्नाटक सरकारनं मनमानी करत हा पुतळा हटवला आहे.

वाचा:

सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलिस बंदोबस्तात पुतळा हटवण्यात आला. या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल शिवप्रेमी जनता विचारत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here