मुंबई :अमेरिकेची शॉर्ट सेलर कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने तब्बल तीन महिन्यांपूर्वी अदानी समुहावरील एका अहवालाने खळबळ उडवली. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गने अदानी ग्रुपवर शेअर्सच्या किमतीत फेरफार आणि फसवणुकीचा आरोप करणारा धक्कादायक अहवाल प्रकाशित केला होता. यामुळे अदानींच्या शेअर्समध्ये जोरदार पडझड झाली, परिणामी गौतम अदानींच्या संपत्तीतही मोठी घट झाली. मात्र आता शेअर्सच्या किमतीतील रिकव्हरीमुळे बँका आता अदानी ग्रुपला कर्ज देण्यासाठी रांगा लावत आहेत. समूहाला कर्ज देणाऱ्या बँकांची संख्या १८ वरून २५ झाली असून गुरुवारी आणखी एक मोठी बातमी समोर आली.

अदानींच्या शेअर्सनी बुडवलं तर ‘या’ शेअर्सनी गुंतवणूकदारांना तारलं, जाणून घ्या सविस्तर
अदानी घेणार आणखी एक कर्ज
अदानी समूह आपल्या नवीन हरित ऊर्जा प्रकल्पांसाठी सुमारे $८०० दशलक्ष (सुमारे ६५०० कोटी रुपये) उभारण्याची योजना आखत आहे, अशी या प्रकरणाशी संबंधित लोकांनी माहिती दिली. अशा स्थितीत कर्ज मंजूर झाल्यास हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी समूहाचे हे सर्वात मोठे कर्ज ठरू शकते. दरम्यान, या कर्जासाठी गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील समूह अनेक बँकांशी चर्चा सुरू आहे. यामध्ये अमेरिकेतील दोन, युरोपमधील तीन आणि जपानमधील तीन बँकांचा समावेश आहे.

आपल्या लोकांनी गौतम अदानीकडे पाठ फिरवली, तर अनोळखी मदतीला सरसावले; जाणून घ्या काय झालं
अदानी-बँकांशी चर्चा
अदानी समूह आपल्या नवीन ऊर्जा प्रकल्पांसाठी कर्ज घेत असून सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यासाठी समूह जगातील आघाडीच्या बँकांशी चर्चा करत आहे. या बँकांमध्ये DBS बँक लिमिटेड, सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन, मित्सुबिशी यूएफजे फायनान्शियल ग्रुप आणि स्टँडर्ड चार्टर्ड यांचा समावेश आहे. दरम्यान, हे कर्ज ७०० ते ८०० दशलक्ष डॉलर्सचे असू शकते. मात्र, कर्जाचा आकार अद्याप निश्चित झालेला नसून ते कमी किंवा जास्त असू शकते.

अदानी-चीन प्रकरणाला नवे वळण, वादात सापडलेले मॉरिस चांग म्हणतात – ‘मी तैवानचा नागरिक’
हिंडेनबर्गने दिला जोर का झटका
शॉर्ट सेलर कंपनीच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स ८०% हुन जास्त घसरले, ज्यामुळे समूहाच्या कंपन्यांचे बाजारमूल्य सुमारे $१०० अब्जांनी घसरले होते. मात्र, आता त्यांच्यात काही प्रमाणात वसुली झाली असून आता समूहाच्या कोणत्याही प्रकल्पाला वित्तपुरवठा करण्यासाठी कर्ज देणे बँकांचा वाढता विश्वास दर्शवतो. उल्लेखनीय आहे की हिंडेनबर्ग अहवालामुळे निर्माण झालेल्या संकटामुळे क्रेडिट सुइससह चार युरोपीय बँकांनी अदानी समूहातून आपली गुंतवणूक काढून घेतली होती.

२०१४ ला अदानी ६०९ क्रमांकावर होते, मग जादू झाली, दुसऱ्या क्रमांकावर कसे पोहोचले? : राहुल गांधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here