म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई :‘केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील,’ अशी टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. शिंदे यांनी ट्विट केले आहे. ‘बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे… या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचाय … गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचाय …. स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही’, असे शिंदे यांनी म्हटले आहे.
‘जोडे पुसायची लायकी असणारे राज्य करत आहेत,’ अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला शिंदे यांनी आपल्या ट्वीटमधून उत्तर दिले. ‘काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की, माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातील लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही. त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे,’ अशी टीका शिंदे यांनी केली. ‘सन २०१९मध्ये जोडे पुसायला कोण गेले होते, जोडे पुसायला गेले होते की, जोडे धुवायला गेले होते, हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे अशाप्रकारची मुजोरी करणाऱ्यांना नागरिक मतदानातून नक्की उत्तर देतील,’ असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी बारसू प्रकल्पासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, पण मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर तत्काळ भूमिका बदलली. याच्यामागचे कारण काय, याचा नागरिकांनी शोध घेतला पाहिजे. ही दुटप्पीपणाची भूमिका आहे. ही भूमिका वारंवार घेतली जाते. समृद्धी महामार्गाबाबतही अशीच भूमिका होती. पण त्याला आम्ही गेमचेंजर प्रकल्प बनवत बाळासाहेब ठाकरे यांचे नावही दिले. बारसूचा प्रकल्प सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच नागरिकांच्या हितासाठी केला जाईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

शरद पवार म्हणाले, भाकरी फिरवणार, पुढच्या काही तासातच रोहित पवारांची मोठ्या पदावर शिफारस!
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय कामगार सेनेच्या ५५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संवाद साधला. एअर कंडिशनरमध्ये बसू कॅबिनेट बैठका घेतात आणि कायदे बदलतात. पण यांना काहीच माहिती नाही. आपण मोर्चे काढले आहेत. पण आता आपल्याला हिंमत दाखवावी लागले, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. बूट निर्माता कंपनी महाराष्ट्रात येणार आहे, असं मी या कार्यक्रमात येण्यापूर्वी एका ट्विटमध्ये वाचलं होतं. पण आता ही कंपनीही तामिळनाडूला गेली आहे. आता हे आरामत बूट पुसत बसतील. सरकार पाडण्याचा सूड मी नक्कीच घेईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जमिनी आमच्या-इमले तुमचे, चालणार नाही; आम्हाला प्रकल्प नको, अन्याय सहन करणार नाही: उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here