MCX वर सोन्या-चांदीचा भाव
५ जून रोजी मॅच्युअर होणाऱ्या सोन्याच्या फ्युचर्समध्ये MCX वर ७३ रुपये किंवा ०.१२ टक्क्यांची किरकोळ घसरण होऊन ५९,९०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर ५ मे मॅच्युअर होणाऱ्या चांदीच्या फ्युचर्समध्ये ६२ रुपये किंवा ०.०८ टक्क्यांनी वाढ झाली आणि भाव ७४ हजार १०८ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. उल्लेखनीय म्हणजे, २७ एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या किमती अनुक्रमे ५९ हजार ९०१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि ७३,९५९ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.
सराफा बाजारात सोने-चांदी
दुसरीकडे, आज २८ एप्रिल रोजी भारतीय सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या किमतीत घट नोंदवली गेली. मात्र, सोन्याचा भाव अजूनही ६० हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या वर व्यवजर करत असून चांदीच्या दरात घसरण होऊनही त्याची किंमत ७४ हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे. राष्ट्रीय स्तरावर ९९९ शुद्धतेच्या २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ६०,३८२ रुपये तर ९९ शुद्धतेची चांदीची किंमत ७४,१७९ रुपये आहे. अपेक्षेपेक्षा मजबूत यूएस चलनवाढ आणि कामगार डेटाच्या पार्श्वभूमीवर यूएस फेड पुढील महिन्यात होणार्या बैठकीत २५ बेस पॉईंटने दरवाढ करणार असल्याचे अपेक्षित आहे. यामुळे आशियाई आणि भारतीय बाजारातील सकाळच्या व्यवहार सत्रात सोन्याच्या दरात घसरण झाली.
या कारणांमुळे जगातली सर्वाधिक सोने खरेदी भारतात होते
प्रत्येक राज्याच्या दरात फरक
भारतीय बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या मानक किमतीची माहिती देतात. या सर्व किमती कर आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. दरम्यान, IBJA द्वारे जारी केलेले दर देशभरात सामान्य असतात पण GSTचा किमतींमध्ये समावेश केला जात नाही. मात्र, दागिने खरेदी करताना करांचा समावेश केल्याने सोन्या-चांदीचे दर वाढतात. अशा परिस्थितीत वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळे कर आकारले जात असल्याने त्यांच्या दरात तफावत असू शकते.