नवी दिल्ली :भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की “चुकीच्या धोरणामुळे मोठे संकट येऊ नये म्हणून रिझर्व्ह बँक देशांतर्गत बँकांच्या व्यवसाय मॉडेलवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.” अमेरिकेतील नुकत्याच घडलेल्या घटनांमागे चुकीचे व्यवसाय मॉडेल हे एक कारण असल्याचे सांगून दास म्हणाले की, “भारताची बँकिंग व्यवस्था मजबूत आहे आणि जागतिक घडामोडींचा त्यावर फारसा परिणाम झालेला नाही.”

सिलिकॉन व्हॅली बँक बुडल्यानंतर काही आठवड्यांनंतर त्यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे. या घडामोडींमुळे अमेरिका आणि युरोपच्या आर्थिक क्षेत्रात संकटाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर दास म्हणाले की, अमेरिकेतील अलीकडच्या घडामोडींमुळे वैयक्तिक बँकांचे व्यवसाय मॉडेल योग्य होते का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फर्स्ट रिपब्लिक बँकेच्या शेअर्सचे ट्रेडिंग बंद, सरकारने मागे खेचले हात; गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली
भारतीय बँकिंग व्यवस्था मजबूत
रिझव्‍‌र्ह बँकेच्या प्रमोटेड कॉलेज ऑफ पर्यवेक्षकांनी आयोजित केलेल्या आर्थिक क्षेत्राच्या सुदृढतेवरील जागतिक परिषदेला संबोधित करताना दास म्हणाले, “भारताची आर्थिक व्यवस्था मजबूत राहिली आहे आणि काही प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक अस्थिरतेचा विपरित परिणाम भारतावर झालेला नाही. रिझर्व्ह बँकेने आता बँकांच्या व्यवसाय मॉडेलवर बारीक नजर ठेवायला सुरुवात केली आहे कारण यातील कोणताही दोष संकट निर्माण करू शकतो.”

अमेरिकन बँकांवर मोठं संकट, मग भारतीय बँकांत तुमचा पैसा किती सुरक्षित? RBIने सत्य काय ते सांगितलं
बँक व्यवस्थापन मंडळाने जोखमीचे मूल्यांकन करावे
दास म्हणाले की व्यवसाय मॉडेल काही वेळा बँकेच्या ताळेबंदातील काही भाग धोक्यात आणू शकते. जे नंतर मोठ्या संकटात बदलू शकते. त्यांनी बँकांच्या व्यवस्थापन आणि मंडळांना नियमितपणे आर्थिक जोखमीचे मूल्यांकन करण्यास सांगितले आणि पुरेसा निधी आणि तरलता ‘बफर्स’ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. ते म्हणाले की हे किमान नियमन बँकांच्या निरंतर बळकटीसाठी आणि शाश्वत वाढीसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त असावे.

महागाई वाढली की बँका कर्जाचे हप्तेही वाढवतात, हे आहे त्यामागचं कारण

दास म्हणाले की, रिझव्‍‌र्ह बँक भविष्यासाठी भारतीय आर्थिक व्यवस्थेला बळकट करण्यासाठी आणि तिच्या शाश्वत वाढीला पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे. दबाव आणि भांडवली बफरच्या आघाडीवर भारतीय बँकांनी अलीकडच्या काळात सुधारणा नोंदवल्या आहेत. बँकांचे सकल NPA प्रमाण डिसेंबर २०२२ मध्ये ४.४१ टक्क्यांवर आले, जे मार्च २०२२ मध्ये ५.८ टक्के आणि ३१ मार्च २०२१ रोजी ७.३% होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here