लातूर: शेतात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका ११ वर्षीय मुलीचा वीज कोसळून मृत्य झाल्याची हृदयद्रावक घटना लातूर जिल्ह्यातील नीलंगा तालुक्यात घडली आहे. मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. आरुषी नथुराम राठोड असं या ११ वर्षीय मुलीचं नाव आहे.लातूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकटासह पाऊस झाला. अनेक ठिकाणी मोठ्या गारा पडल्याने शेतपिकांचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी वीज कोसळून जिवीतहानी झाली. जिल्ह्यात एकूण अकरा जनावरं वीज कोसळून दगावली आहेत. तर एका अल्पवयीन मुलीचाही वीज कोसळल्याने मृत्यू झाला आहे.
निलंगा या तालुक्याच्या ठिकाणापासून चार किलोमीटर असणाऱ्या मुबारकपूर तांड्यावर आरुषी नथुराम राठोड ही ११ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. काल दुपारी ती शेतात शेळ्या चरण्यासाठी गेली होती. मात्र, आभाळ भरून आले आणि पावसाचे वातावरण निर्माण झाले. वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. विजांचा कडकडाट आणि गारांसह पाऊस कोसळू लागला.पावसापासून बचावासाठी आरुषीने झाडाकडे धाव घेतली. मात्र, तिच्यावर वीज कोसळली त्यातच तिचा मृत्यू झाला. ही घटना समजताच तांड्यावर शोककाळा पसरली आहे.

अमरावतीत वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; कुंड नदीला महापूर, गावांचा संपर्क तुटला