बंगळुरुमधील एका घरमालकानं अपार्टमेंटमधील त्याचा फ्लॅट भाड्यानं देण्यास नकार दिला. त्यानं त्या युवकाला बारावीला ७५ टक्के गुण असल्यानं घर नाकारलं आहे. त्या घरमालकानं त्या युवकाला ९० टक्के गुण नसल्यानं घर नाकारलं. याशिवाय त्या घरमालकानं संबंधित युवकाकडून त्याच्या विषयीची माहिती देखील मागवून घेतली होती.
घरमालकानं मध्यस्थातर्फे त्या युवकाला नकार दिला. मध्यस्थातर्फे घरमालकानं त्या युवकाच्या ट्विटर, लिंकडेन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या लिंक मागितल्या होत्या. कंपनीचं जॉईनिंग लेटर देखील मागितलं होतं. याशिवाय दहावी बारावीची गुणपत्रक, आधार कार्ड पॅन कार्ड देखील मागितलं होतं. त्याशिवाय त्या युवकाला स्वत: बद्दल २०० शब्दांची माहिती मागवली होती.
घरमालकानं मध्यस्थातर्फे माहिती मिळवल्यानंतर त्याचा निर्णय जाहीर केला. संबंधित युवकाला बारावीला ७५ टक्के मिळाले होते. तर, घरमालकाची अपेक्षा ही ९० टक्के गुण असावेत,अशी होती. हा प्रकार समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी फिरकी घेण्यास सुरुवात केली आहे.
घर भाड्यानं देताना अनेक अट
घरमालक ज्यावेळी घर भाड्यानं देत असतात त्यावेळी भाडेकरुंवर असंख्य अटी लादत असतात. काही ठिकाणी जादा भाडं सांगितलं जातं. काही ठिकाणी मेटेनन्सचे पैसे सांगितले जातात. काही ठिकाणी नॉन वेज जेवण बनवण्यावर बंदी घातलेली असते. काही ठिकाणी मित्र मैत्रिणींच्या प्रवेशावर बंदी घातलेली असते. या सर्व अटींचा सामना करत करत भाड्यानं घर मिळवावं लागतं.
मात्र, बंगळुरुमध्ये घडलेल्या अनोख्या घटनेची जोरदार चर्चा सुरु आहे. बारावीला ७५ टक्के मार्क मिळाल्यानं घरमालकानं घर भाड्यानं देण्यास नकार दिला. ब्रोकरनं हा निर्णय संबंधित युवकाला कळवला. त्यानंतर या संभाषणाचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे संभाषण योगेश नावाचा युवक आणि ब्रिजेश नावाचा ब्रोकर यांच्या दोघातील आहे.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या