मुलीच्या अंगावर जखमेच्या खुणा असल्याने संशय
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान या चिमुकलीने जीव सोडला. रुग्णालय प्रशासनाच्या वतीने चौक बाजार पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांचे पथक तात्काळ रुग्णालयात पोहोचले. मुलीच्या शरीरावर जखमेच्या खुणा होत्या. यावरून पोलिसांना संशय आला. त्याआधारे पोलीस आणि रुग्णालयाच्या डॉक्टर पॅनलने शवविच्छेदन करण्याचा निर्णय घेतला.
मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली
शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती उघड
या ५ वर्षांच्या चिमुकलीच्या शरीरावर असलेल्या जखमा या सामान्य पडल्यामुळे झाल्या नसल्याचं शवविच्छेदन अहवालातून समोर आलं. तर या जखमा तिला वारंवार पटकल्याने झाल्याचं कळालं. यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी चिमुकलीची हत्या झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली. हत्येच्या संशयावरून पोलिसांनी मृत मुलीच्या नातेवाईकांची चौकशी सुरू केली, तेव्हा त्यांना जे कळालं त्याने पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली.
मुलगी अपंग असल्याने तिला मारलं
या चिमुकलीच्या आईनेच तिची हत्या केल्याचं पोलिसांना कळालं. आरोपी आईने पोलिस तपासात सांगितलं के, तिची मुलगी अपंग होती आणि त्यामुळे ती तिला खूप त्रास देत असे. यालाच कंटाळून तिने रागाच्या भरात मुलीला जमिनीवर अनेकवेळा आपटले. त्यात मुलगी जखमी झाली आणि रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आईला अटक करून तिच्यावर गुन्हा दाखल केला आहे.