अहमदनगर: तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील जवान नायक भरत लक्ष्मण कदम यांचे आसाममधील तेजपूर येथे लष्कारी कवायतीदरम्यान हृदयविकाराने निधन झाले. त्यांचे पार्थीव रविवारी येथे पोहचणार असून त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

२००३ मध्ये लष्करात भरती झाले. विविध ठिकाणी त्यांनी काम केले. सध्या ते आसाम येथे नायक पदावर कार्यरत होते. शुक्रवारी सकाळी दैनंदिन कवायत सुरू होती. त्यामध्ये विविध कसरतीही सादर केल्या जात होत्या. त्यावेळी भरत यांच्या छातीत दुखू लागले. त्यांना तातडीने जवळच्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारांसाठी अत्याधुनिक सोयी असलेल्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगी, आई-वडील व एक भाऊ असा परिवार आहे. त्यांचे आई-वडील शेती करतात.

वाचा:

भरत हे दोन वर्षांनी सेवानिवृत्त होणार होते. त्यानंतर गावीच स्थायिक होण्याचा त्यांचा विचार होता. चीनच्या सीमेवर वातावरण तणावपूर्ण असल्याने मधल्या काळात त्यांना सुट्टी मिळाली नव्हती. मात्र, मुलीच्या वाढदिवसासाठी सुट्टीवर येण्याचे त्यांचे नियोजन होते. त्यासाठी सुट्टी मंजूरही झाली होती. मुलीचा पहिला वाढदिवस धडक्यात साजरा करण्याची त्यांची व त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. दुर्दैवाने ती अपूर्ण राहिली.

वाचा:

भरत यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात येत आहे. रविवारी (९ ऑगस्ट) सकाळी साडेअकरा वाजता पिंपरी जलसेन येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here