उत्तराखंडः फेसबुक फ्रेंडचा वाढदिवस साजरा करायला गेला मात्र शिक्षक तरुणीच्या जाळ्यात फसला. उत्तराखंडमधील उधम सिंहनगरमध्ये एका शिक्षकासोबत हनीट्रॅपचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी जोडप्यावर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.काशीपुर येथे राहणाऱ्या एका शिक्षकाची फेसबुकच्या माध्यमातून एका तरुणीसोबत ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये रोज बोलणं होऊ लागले व मैत्री वाढत गेली. २१ एप्रिलला फेसबुक फ्रेंडने शिक्षकाला बोलावून घेतले. वाढदिवस असल्याचे सांगून त्याला जसपुर येथील रुद्राक्ष गार्डनला भेटण्यासाठी बोलावले. तिथे गेल्यानंतर ती महिला त्याला हॉटेलमधील रुममध्ये घेऊन गेली.

शिक्षकाला हॉटेलच्या रुममध्ये घेऊन गेल्यानंतर महिलेच्या मित्रांनी दोघांचा अश्लील व्हिडिओ काढला. तसंच, त्यांनी केलेल्या प्लानिंगनुसार दोघे मित्रही रुममध्ये घुसून शिक्षकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसंच, हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत २ लाख रुपये उकळले. त्यानंतर शिक्षकाने त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीला हॉटेलमध्ये बोलवून घेत ३० हजार रुपय दिले. तसंच, १० हजार रुपये ऑनलाइन दिले. त्याचबरोबर महिलेच्या साथीदारांनी स्कुटी, क्रेडिट कार्ड आणि मोबाइल हिसकावून दिला. पोलिसांनी पिडीत शिक्षकाच्या तक्रारीवर आधारित गुन्हा दाखल केला आहे.

चिमाजी आप्पांनी जिंकलेला ठाण्यातील ऐतिहासिक किल्ला नामशेष, पुरातत्व विभागाची धक्कादायक कबुली
पोलिसांनी एका दाम्पत्यासह ४ जणांना अटक केली आहे. पोलिसांनी या चौघांकडून स्कुटी, मोबाईल आणि क्रेडिट कार्डसह २० हजार रुपयांची रक्कम ताब्यात घेतली आहे.

मालाड पश्चिमेतील वाहतूककोंडी फुटणार, रेल्वे स्थानक परिसरातील ज्वेलरी, फिश मार्केट भुईसपाट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here