स्टॉयनिसच्या धमाक्याने लखनौ संघाने शानदार विजय मिळवला असला तरी आता त्यांचे टेन्शन वाढले आहे. पंजाबची फलंदाजी सुरू असताना स्टॉयनिसला दुखापत झाली. स्टॉयनिसला सध्या बोटांची दुखापत आहे, जी संघासाठी आणि त्याच्यासाठी अजिबात चांगली नाही.
पंजाब किंग्जविरुद्ध स्टॉयनिस त्याची दुसरी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमध्ये अथर्व तायडेने एक स्ट्रेट ड्राइव्ह मारला जो रोखण्याच्या प्रयत्नात स्टॉयनिसने स्वत:ला जखमी करून घेतले. स्टॉयनिसची दुखापत पाहण्यासाठी मेडिकल टीम मैदानात आली आणि त्यानंतर तो सामना सोडून बाहेर गेला.
स्टॉयनिसची दुखापत किती गंभीर आहे हे अद्याप कळू शकले नाही. पण आता त्याचे स्कॅन होणार आहे त्यानंतरच कळू शकले की तो पुढील सामने खेळू शकेल की नाही. ज्या पद्धतीने स्टॉयनिसला दुखापत झाली आहे आणि त्याने मैदान सोडले त्यावरून हे निश्चित आहे की तो पुढील काही सामने खेळू शकणार नाही. जर दुखापत गंभीर असेल तर तो हंगामातून बाहेर होऊ शकतो. मार्कस स्टॉयनिससारखा विजय मिळून देणारा खेळाडू संघाबाहेर झाला तर ते लखनौसाठी परवडणारे नसेल. पंजाबविरुद्ध धमाकेदार फलंदाजी सोबत त्याने शिखर धवन सारख्या धोकादायक खेळाडूची विकेट मिळवली होती.
मुंबई इंडियन्सची टीम एअरपोर्टवर स्पॉट, जोफ्रा आर्चरने खाल्ला भाव