मुंबई : वडिलांनी आपल्या मुलीवर आणि पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या मुलीचं लग्न समाजाबाहेर होणार याला विरोध करत वडिलांनी मुलीवर लग्नाच्या अवघ्या तीन दिवस आधी हल्ला केला.मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात ही घटना घडली. आपल्या मुलीचं लग्न समाजाबाहेर होणार असल्याचा राग वडिलांच्या डोक्यात होता. त्याशिवाय मुलीच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेत आपलं नाव नसल्याचा रागही त्यांच्या मनात होता. या रागातून संतापलेल्या ७९ वर्षीय वडिलांनी गुरुवारी मुलीवर हल्ला केला. मुलीच्या लग्नाच्या केवळ तीन दिवस आधी प्रकार घडला. रविवारी मुलीचं लग्न होणार होतं.

७९ वर्षीय प्रभाकर शेट्टी या वृद्धाने मुलीसह त्यांच्या ६८ वर्षीय पत्नीवरही हातोडा आणि चाकूने हल्ला केला. त्यांनी पत्नीवर हल्ला करण्यासह तिचा गळा दाबून मारण्याचाही प्रयत्न केला. अंधेरीतील त्यांच्या चार बंगल्यातील घरी हा भयंकर प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नवरी आणि तिच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पोलिसांनी त्या दोघींची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे.

मित्र-मैत्रिण फिरण्यासाठी गेले, रस्त्यातच नराधमांनी अडवलं, एकाने छेड काढली, दुसऱ्याने गोळी घातली

काय आहे प्रकरण?

७९ वर्षीय प्रभाकर शेट्टी यांच्या ३८ वर्षीय मुलीने त्यांच्या समाजाबाहेर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी तिचं लग्न होणार होतं. मुलीचं समाजाबाहेर लग्न होत असल्याने त्यांच्या कुटुंबात तणावाच वातावरण होतं. या लग्नाला वडिलांचा विरोध होता. मुलीच्या निर्णयावर ते नाखूष होते. वडिलांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांनी हे भयंकर पाऊल उचलल्याचं पोलिसांनी सांगितलं.

पत्नी घर सोडून गेली, नवऱ्याचं डोकं सटकले, पोटच्या दोन मुलांसोबत केलं अमानुष कृत्य, एकाचा मृत्यू
बुधवारी त्या मुलीचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यासाठी केवळ मुलीची आई गेली होती. वडिलांचा विरोध असल्याने ते घरातचं होते. मुलीच्या साखरपुड्यासाठी तिचे वडील गेले नव्हते.

साखरपुड्याच्या एका दिवसानंतर मुलीची आई दुपारच्या वेळेत झोपली होती. तिला अचानक जाग आली तेव्हा तिचा पती हातोड्यासह उभे असल्याचं दिसलं. ते पाहून महिलेने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पतीने महिलेच्या मानेवर, छातीवर हल्ला केला. ती मदतीसाठी ओरडू लागली त्यावेळी त्याने तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला असल्याचं ६८ वर्षीय महिलेने वर्सोवा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

बहिणीला भेटून घराकडे निघाले, वाटेत आक्रित घडलं, क्षणात भावाचा संसार उद्ध्वस्त
त्याचवेळी बाहेर बसलेल्या मुलीने आवाज ऐकला आणि ती आईच्या बचावासाठी धावली त्यावेळी वडिलांनी तिच्यावरही हल्ला केला. वृद्धाने आपल्या मुलीच्या डोक्यावर, छातीवर आणि हातावर चाकूने हल्ला केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. तरुणीला दुखापत झाली असूनही, तिने स्वत:ला आणि तिच्या आईला वाचवत बेडरूममधून पळ काढला आणि शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावलं.

वृद्ध प्रभाकर शेट्टीची सध्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तसंच पोलिसांनी त्यांच्या स्कॉटलंडमध्ये असणाऱ्या मुलाला याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान ही तरुणी एका खासगी कंपनीत नोकरीला असून तीच तिच्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेत होती अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here