पुणे : “सबसे कातिल गौतमी पाटील”ची महाराष्ट्र सर्वत्र क्रेज आहे. मुलाचं बारस, गावची जत्रा किंवा कोणत्याही कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच पाहिजे असं सगळ्यांचं मत असतं. मात्र, गौतमी पाटलाचा एक व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. पुणातल्या मुळशी तालुक्यात गौतमी पाटीलने चक्क एका बैलासमोर आपली अदा सादर केली. याबद्दल पुण्यात प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीने विरोधी पक्षनेते अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर “अरे तुला काय वाईट वाटतंय? ती बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास होतोय? अशी मिश्कील टिप्पणी अजित पवारांनी केली आहे.

‘यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का रात्री?’ या वक्तव्यावरही अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “अनेक गावांत यात्रा, जत्रा सुरू आहेत. तेव्हा काही ठिकाणी करमणुकीसाठी तमाशे बोलवले जातात. त्यामुळे सध्या गौतमीचं नाव गाजत असून, पाटलीबाईंना आणा, याबद्दल मी सुचवलं होतं. जर त्यांना सुपारी परवडत, असेल तर नक्की बोलवावे,” असंही अजित पवार म्हणाले.

भाजप पदाधिकाऱ्याला दणका: महिला नगरसेविकेविरोधातील वक्तव्य महागात; १ कोटी रुपये मोजावे लागणार
“बैल काय गायीसमोर नाचू देत, तिचा तो अधिकार आहे. हाच गौतमीचा व्यवसाय आणि उपजिविकेचं साधन देखील आहे. कला आणि अभिनयाच्या माध्यमातून ती त्याच्याकडं पाहते. लहान मुलाचं बारसं आहे, त्याला अजून काहीच कळत नाही. तरी देखील बारशाच्या निमित्ताने बोलावलं, तर तिला नाचावच लागतं. बैलाचा वाढदिवस असो किंवा शर्यतीत बैलगाडा पहिला आला असेल, तिचे ते कामच आहे,” असंही अजित पवारांनी सांगितलं.

बारसूतील आंदोलन ३ दिवसांसाठी स्थगित; आजचा दिवस ठरणार निर्णायक, कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here