गेल्या १५ दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यातील व्यवहार पूर्वपदावर येत असताना कोव्हिड विषाणू प्रादुर्भाव साखळीही झपाट्याने विस्तारत चालली आहे. त्यामुळे करोनाने शहरात प्रवेश केल्यापासून आतापर्यंत ८४०६ जणांना विळखा घातला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातील ३ हजार रुग्ण हे गेल्या २० दिवसांमधील आहेत. तर दुसऱ्या बाजूला या आजाराने मार्चपासून आजवर बळी पडलेल्यांचा आकडाही तीन शतकांच्या उंबरठ्यावर अगदी आठ पावले दूर २९२ पर्यंत जाऊन पोचला आहे.
शहर आणि जिल्ह्यात रविवारी २३२० जणांच्या घशातील स्त्राव नमुना तपासला गेला. यातील शहरातून ५५० तर ग्रामीण भागातून १०९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. सध्याच्या स्थितीत शहरात १२४१ आणि जिल्ह्यात ८५० सक्रिय करोनाबाधित रुग्ण विविध कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. त्यापैकी सर्वाधिक ३५५ जणांचा मेडिकलवर २४३ जणांचा भार मेयोवर येऊन पडला आहे. एम्समघील ३५ रुग्ण वगळले तर उर्वरित सर्व सक्रिय रुग्णांवर मनपाने सुरू केलेल्या २५ कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
नव्याने करोनाची बाधा झाल्याचे निदान करण्यात आलेल्यांपैकी रविवारी मेडिकलच्या लॅबमधून १३५, मेयोतून ११६, निरीतून ९८, एँटिजन रॅपिड टेस्टमधून ९५, एम्समधून ८९, खासगीतून ८१, माफ्सूतून ४५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. करोनाची लागण होऊन मेयोत उपचारादरम्यान दगावलेल्यांमध्ये कळमनातील जयभीम चौकातील ५८, पंचवटी चौकातील ५८, गांधीबाग जलपूरा येथील ५६, आशिर्वाद नगरातील ३५, मोठा ताजबाग येथील ७४, जागनाथ बुधवारीतील ५६, आमदार निवासातून रेफर करण्यात आलेला ४० वर्षीय पुरुष अशा सात जणांचा तर कावरापेठ येथील ५५, पंचशील नगरातील ७०, कामठीतील ६५ अशा तीन महिलांचा समावेश आहे.
तपासणी न करताच अहवाल सकारात्मक
वानाडोंगरी येथील तपासणी केंद्रात एका सराफा व्यावसायिकाची करोना चाचणी न करताच त्याला करोना असल्याचे सांगण्यात आले. हा व्यावसायिक सौम्य लक्षणे असल्याने तपासणीसाठी सकाळी या केंद्रात गेला होता. त्याला डॉक्टरांनी दुपारी २ वाजता नमुने देण्यासाठी बोलावले. परंतु त्यावेळी त्याला येणे जमले नाही. दरम्यान संध्याकाळी ५ वाजता त्याला केंद्रातून भ्रमनध्वनीवर संपर्क साधत तुमचा चाचणी अहवाल सकारात्मक आल्याचे सांगण्यात आले. नमुनेही न देता त्याला करोना असल्याचे सांगण्यात आल्यावर त्याला धक्काच बसला. तातडीने त्याने ग्राम पंचायत सदस्यांसह केंद्र गाठत तपासणी न करता अहवाल सकारात्मक कसा, असे विचारत अहवाल मागितला. शेवटी अधिकाऱ्यांनी चूक दुरूस्त केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Very good article! We are linking to this particularly great content on our site. Keep up the great writing.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.
I really like and appreciate your blog post.
Like!! Thank you for publishing this awesome article.