अहमदनगर : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. नगर जिल्ह्यातही महाविकास आघाडीला कौल मिळाला आहे. मात्र, पाथर्डी कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीवर भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी सत्ता काबीज केली आहे. राजळे यांनी १८ पैकी १७ जागा जिंकल्या. राष्ट्रवादीचे नेते प्रताप ढाकणे यांच्या नेतृत्वाखालील मंडळाला अवघी एक जागा मिळाली.पूर्वी या बाजार समितीमध्ये प्रताप ढाकणे गटाची सत्ता होती. यावेळी आमदार राजळे यांनी ही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी जोरदार ताकद लावली होती. त्यांनी ढाकणे यांच्या मंडळाच्या विरोधात सक्षम उमेदवार दिले होते. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची लढत होईल, असे बोलले जात होते.

प्रत्यक्षात वातावरण पूर्णपणे फिरले आणि निवडणूक राजळे यांच्या बाजूने एकतर्फी झाली. राजळे यांच्या आदिनाथ शेतकरी मंडळाने १८ पैकी १७ जागा जिंकल्या. ढाकणे यांच्या जगंदबा मंडळाला केवळ एक जागा जिंकता आली.

मविआच्या जोडीला भाजपचा मोठा गट, पण बोरनारे इरेला पेटले, शिंदे गटाकडे विजय खेचून आणला
या निवडणुकीत ढाकणे यांनी वेगळा प्रयोग केला होता. त्यांनी सध्याच्या १६ संचालकांना उमेदवारी नाकारत नवीन उमेदवार उभे केले होते. त्यातील नाराजांनी विरोधकांना साथ दिल्याने ढाकणे यांचा प्रयोग फसल्याचे मानले जात आहे.

ऐतिहासिक विजय; औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 16 जागांवर भाजप

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ढाकणे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात होते. लवकरच होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतही ढाकणे यांना राजळे यांच्या विरोधात लढावे लागणार आहे.

मोनिका राजळे यांचे पती राजीव राजळे यांनी राष्ट्रवादीकडून अहमदनगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. राजळे हे उच्च शिक्षित आणि अभ्यासू आमदार म्हणून प्रसिद्ध होते. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे होत. २०१७ मध्ये राजीव राजळे यांचं अकस्मात निधन झालं.

नगरमध्ये थोरातच जोरात! विखेंचा होमग्राऊण्डवर धुव्वा, उमेदवाराला अवघं एक मत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here