अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्हयातील चार कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल जाहीर झाला आहे. या चार बाजार समितीच्या निवडणुकीत काँगेस प्रणित पॅनलने बाजी मारत सत्ता काबीज केली आहे. तसंच काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपलं वर्चस्व कायम देखील ठेवलं आहे.नांदेड जिल्ह्यातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या भोकर मतदारसंघातील बाजार समितीत अशोक चव्हाण यांनी आपला गड शाबूत ठेवला आहे. एकूण १८ पैकी १३ जागी काँग्रेस, तर दोन जागा राष्ट्रवादीला मिळाल्या आहे. तसंच भाजपाला केवळ तीन जागांवर समाधान मानावं लागलं. पहिल्यांदा बाजार समितीच्या निवडणुकीत उतरलेल्या बीआरएस पक्षाला भोकरमध्ये मात्र अपयश आलं आहे. बीआरएस पक्षाला एकही जागा मिळवता आली नाही.

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, भुसावळ बाजार समिती निवडणुकीत भाजप शिवसेनेच्या पॅनलचा विजय

हिमायतनगर बाजार समितीत काँगेसला एकहाती सत्ता मिळाली. १८ पैकी १८ जागा काँगेसने जिंकल्या. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचा इथे दारुण पराभव झाला. नायगाव बाजार समिती बीनविरोध निघाली. १२ काँग्रेस, तर भाजपला ६ जागा मिळाल्या. कुंटूर बाजार समितीत काँगेसला १३ तर भाजप समर्थक पॅनलला पाच जागा मिळाल्या. एकंदरीत चारही बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठं यश आलं आहे.

राऊतांची सभा झाली, मात्र राहुल कुल यांनी राष्ट्रवादीला घाम फोडला; बाजार समितीत काँटे की टक्कर
विशेष म्हणजे या निवडणूकसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. दोन्ही पक्षातील नेते तळ ठोकून होते. दरम्यान नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा उद्या रविवारी जाहीर होणार आहे. यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत आहे. या निकालाकडे सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष लागलं आहे.

वळसे पाटलांनी उमेदवारी नाकारली,देवदत्त निकमांचं बंड; विजय मिळवत इतिहास रचला,राष्ट्रवादीच्या उमेदवारालाच पाडलं
कुंटूरची निवडणूक ठरली चर्चेची

नांदेड जिल्ह्याच्या चार बाजार समितीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. भोकर, हिमायतनगर, नायगाव आणि कुंटूर या चारही बाजार समितीवर काँग्रेसने एकहाथी सत्ता मिळवली आहे. सर्वाधिक चर्चेची कुटूंर बाजार समितीची ठरली. राज्यात विरोधी पक्ष असताना देखील काँग्रेस आणि भाजपने युती करत सत्ता मिळवली आहे. सर्व जागा बिनविरोध मिळवल्या आहेत. काँग्रेसला १३, तर भाजपाला ५ जागा देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here