मुंबई: अभिनेता सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवती हिचा भाऊ शौविक चक्रवर्तीची ईडीने १८ तास कसून चौकशी केली आहे. प्रकरणी ही चौकशी करण्यात आली आहे. त्यामुळे सुशांत आत्महत्याप्रकरणी चक्रवर्ती कुटुंबाच्या भोवतीचा फास अधिकच आवळल्या गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या आधी शुक्रवारी ईडीने शौविकची दोन तास कसून चौकशी केली होती. त्यानंतर त्याला घरी जाण्यास परवानगी दिली होती. त्यानंतर सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीची ९ तास कसून चौकशी करण्यात आली होती. सुशांत आत्महत्या प्रकरणी ईडीने आतापर्यंत रिया, शौविकसह सुशांतची मॅनेजर श्रृती मोदी आणि सीए रितेश शाहचीही चौकशी केली आहे. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुटुंबीयांवर १५ कोटीचा घपला केल्याचा आरोप केला आहे. शौविक काल दुपारी बाराच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात आला होता. आज पहाटे सहा वाजता तो ईडीच्या कार्यालयातून बाहेर पडला. तब्बल १८ तासाच्या चौकशीत ईडीने शौविकवर सुशांतच्या बँक खात्याशी संबंधित प्रश्नांचा मारा केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दरम्यान, बिहार पोलिसांनी सुशांतसिंह प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे सीबीआयला सोपवली आहेत. सुशांतसिंह प्रकरणात आपल्यालाही पक्षकार बनविण्यात यावं, अशी विनंती सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तर, सुशांतचे वडील के. के. सिंह आणि त्याची बहीण राणी सिंह यांनी शनिवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची भेट घेऊन चर्चा केली. हे प्रकरण सीबीआयकडे गेल्याने तुम्हाल न्याय मिळेल, असा विश्वास खट्टर यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, काल रियाचीही आठ तास चौकशी करण्यात आली. या चौकशीचा तपशील हाती आला नसला तरी रियाकडून तपासात सहकार्य केले जात नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता रियाकडून असहकार कायम राहिल्यास ईडीकडून अटकेची कारवाई केली जाण्याची दाट शक्यता आहे. आजच्या चौकशीनंतर रियाला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते, असेही सांगितले जात आहे. दरम्यान, जबाब नोंदवण्याची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, ही विनंती घेऊन रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने रियाचा विनंती अर्ज फेटाळला. त्यामुळेच ईडीकडून आधीच बजावण्यात आलेल्या समन्सनुसार रियाला ईडीचे कार्यालय गाठावे लागले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here