मुंबई:
गेटवे ऑफ इंडिया येथे आंदोलनादरम्यान ” (काश्मीर स्वतंत्र करा) हे पोस्टर झळकवणाऱ्या महक मिर्झा प्रभू या मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच सुवर्णा साळवे, फिरोझ मिठीबोरवाला, जेएनयूचा माजी विद्यार्थी आणि कार्यकर्ता उमर खालिद यांसह एकूण ३१ आंदोलनकर्त्यांवर दाखल करण्यात आला आहे.

जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याविरोधात विद्यार्थी आणि अनेक युवक-युवती गेटवे ऑफ इंडियाला निदर्शने करत होती. यापैकी ३१ जणांविरुद्ध कुलाबा पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. दुसरीकडे हुतात्मा चौकात आंदोलन करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवरदेखील गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महक मिर्झा प्रभू हिच्यावर तिने फ्री काश्मीर म्हणणारे पोस्टर झळकवल्याबद्दल भादंविच्या १५३ ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन एफआयआर कुलाबा पोलीस ठाण्यात तर दोन एफआयआर माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

जेएनयू हल्ल्याविरोधात मागील दोन दिवसांपासून गेट वे ऑफ इंडियावर विद्यार्थी-युवकांचे आंदोलन सुरू होते. सोमवारी रात्री या आंदोलनात ‘फ्री काश्मीर’चे पोस्टर झळकावणाऱ्या विद्यार्थीनीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. जेएनयू हल्ला विरोधी आंदोलन फुटीरतावाद्यांचे असल्याचे ‘फ्री काश्मीर’च्या पोस्टरमुळे सिद्ध होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र, आपण काश्मीरमधील नसून मुंबईतील रहिवासी असल्याचे महकने स्पष्ट केले. ‘काश्मीरमध्ये मागील १५० दिवसांपासून सर्व व्यवहार ठप्प आहे. आपण इथे राहून त्यांच्या अडचणी समजू शकत नाही. आपल्यासारखे स्वातंत्र्य काश्मीरमधील लोकांना मिळाले पाहिजे,’ असे ती म्हणाली. मेहकने झळकावलेले फ्री काश्मीरचे पोस्टर हे काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची मागणीशी सुसंगत असल्याचा आरोप करण्यात येत होता. मात्र, महकने हा आरोप फेटाळून लावला होता. तरीही तिच्यावर मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here