Home Minister Amit Shah To Visit Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

 

amit shah
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज, रविवारी पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. मुंबईत एका कौटुंबिक विवाह सोहळ्यासाठी ते येत असल्याचे सांगितले जात असले तरी राजकीय चर्चेला मात्र उधाण आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या १००व्या भागानिमित्त विलेपार्ले येथे होणाऱ्या कार्यक्रमात शहा हे सहभागी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे वितरण झाले होते. यानंतर आता ते पुन्हा एकदा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १००व्या भागासाठी भाजपने मुंबईतील विलेपार्ले येथील डहाणूकर महाविद्यालयात कार्यक्रम आयोजित केला आहे. यासाठी ते उपस्थित राहणार आहेत. दुसरीकडे या मुंबई भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. या कार्यक्रमात भाजप नेत्यांबरोबरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांच्या उपस्थितीबाबत भाजपने अधिकृत माहिती दिलेली नाही.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here