अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणाला राजकीय वळण लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधतानाच मुंबई पोलिसांनाही कानपिचक्या दिल्या आहेत. शिवाय या प्रकरणी राऊत यांनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. अंकिता लोखंडे व रिया चक्रवर्ती या दोन अभिनेत्री तरुणी त्याच्या आयुष्यात होत्या. यापैकी अंकिताने सुशांतला सोडले व रिया त्याच्या सोबत होती. आता अंकिता रिया चक्रवर्तीविषयी वेगळे बोलत आहे. मुळात अंकिता व सुशांत हे वेगळे का झाले त्यावर प्रकाश पाडायला कोणी तयार नाही. तपासाचा तो एक भाग असायला हवा, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
सुशांतचे त्याच्या पाटण्यातील वडिलांशी संबंध चांगले नव्हते. मुंबई हाच त्याचा ‘आशियाना’ होता. या सर्व काळात सुशांत वडील व इतर नातेवाईकांना किती वेळा भेटला, सुशांत किती वेळ पाटण्याला गेला ते समोर येऊ द्या, असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून राऊत यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
राऊत काय म्हणाले?
>> या प्रकरणात ज्या बॉलीवूड कलाकारांची नावे येत आहेत त्यातील बहुतेक ‘डी’ ग्रेड मंडळी आहेत. अनेक वर्षे ती पडद्यावर दिसत नाहीत व इतर व्यवसाय करून ते जगत आहेत. यातील काही लोकांचा आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क आला म्हणून जे कुणी जमिनीवर काठ्या आपटत असतील तर ते चुकीचे आहे. या प्रकरणात सरकारविरोधी पक्षाने महाराष्ट्रापेक्षा बिहार पोलिसांची बाजू घेणे हा प्रकार धक्कादायक आहे. बिहारप्रमाणे काही गुप्तेश्वर पांडे महाराष्ट्र पोलिसांत आहेत व त्यांच्यामुळे अडचणीत भर पडली हे माझे अनुमान आहे.
>> सुशांतच्या मृत्यूआधी दिनो मोरिया या अभिनेत्याच्या घरी एक पार्टी झाली. या पार्टीभोवती रहस्य निर्माण करून त्याचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडला गेला. दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रपरिवारातले आहेत व त्यामुळेच आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरेंवर झडत असतील तर ते चूक ठरेल. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही.
>> मुंबई पोलिसांनी हा तपास नको तितका जास्त खेचला. सिनेसृष्टीतील सेलिब्रिटीजना रोज चौकशीला बोलवायचे व ‘गॉसिप’ला वाव द्यायचा. या प्रकरणाचा वापर सिनेसृष्टीत दहशत निर्माण करण्यासाठी झाला काय ते पाहायला हवे.
>> हे प्रकरण ‘हाय प्रोफाईल’ होत आहे असे दिसून येताच मुंबई पोलिसांतर्फे एक दिवसाआड तपासाबाबत माहिती पत्रकारांसाठी जाहीर करायला हरकत नव्हती. यात कुणी मंत्री किंवा राजकीय व्यक्ती असेल तर पोलीस त्याचेही स्टेटमेंट घेतील, असे सुरुवातीलाच सांगायला हरकत नव्हती.
>> भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाचे राजकीय भांडवल करण्याचे ठरवले व मंत्रिमंडळातील तरुण मंत्र्यांचे नाव या प्रकरणाशी जोडून सनसनाटी निर्माण केली. दुसऱया बाजूला दोन इंग्रजी वृत्तवाहिन्या सुपारी घेतल्याप्रमाणे मुख्यमंत्री ठाकरे यांना सुशांतप्रकरणी आव्हान देत राहिल्या. त्यामुळे पोलीस गोंधळले.
>> बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत. त्याच वेळी दुसऱ्या राज्याचा काहीच संबंध नसताना त्यांनी समांतर तपास सुरू करावा हा मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर अविश्वास आहे. सत्य समजून घेणे हा सगळय़ांचा अधिकार आहे. पण हे सत्य फक्त बिहारचेच पोलीस किंवा सीबीआय शोधू शकेल, ही भूमिका चुकीची आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I love looking through a post that can make people think. Also, many thanks for permitting me to comment!
Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.
These are actually great ideas in concerning blogging.
I really like and appreciate your blog post.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.