Nagpur Crime News: बारावीची परीक्षा दिली, सुट्ट्यांमध्ये क्लास लावले, क्लासला जात असतानाच १९वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. कपिलनगरमधील खळबळजनक घटना

 

nagpur crime news
म.टा. प्रतिनिधी, नागपूरः कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी येथील पंचम अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेत १९वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.स्नेहा पंकज शर्मा (वय १९, रा. कडू लेआउट, म्हाडा कॉलनी) असे मृतकाचे नाव आहे. स्नेहाने बारावीची परीक्षा दिली असून, ती एमएचसीआयटीच्या शिकवणी वर्गाला जायची. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे स्नेहा शुक्रवारी सकाळी शिकवणी वर्गाला जाण्यासाठी घरून निघाली. शिकवणी वर्गात बॅग ठेऊन ती बेपत्ता झाली. ११.३० वाजताच्या सुमारास स्नेहाने शिकवणी वर्गासमोरीलच पंचम अपार्टमेंटच्या चौथ्या माळ्यावरून उडी घेतली. यात ती जखमी झाली. नागरिकांनी धाव घेत तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. स्नेहाचे वडील खासगी कंपनीत काम करतात. तिच्या आईचे घरीच ब्युटी पार्लर असून तिला चार वर्षांचा भाऊ आहे. स्नेहाच्या आत्महत्येने शर्मा कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कारण गुलदस्त्यात

स्नेहा मनमिळाऊ स्वभाची व हुशार होती. शेजारी राहणाऱ्यांशी ती नेहमी आदराने बोलायाची. ती आत्महत्या करेल, असे कोणालाही वाटले नव्हते. तिने आत्महत्या केल्याने शेजाऱ्यांनाही धक्का बसला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात असून पोलिसांनी स्नेहाचा मोबाइल जप्त केला आहे.

जुनाबाई आणि डागोबाची पिल्लांसह मस्ती कॅमेरात कैद; तलावाकाठी बछड्यांवर प्रेम करणारी वाघीण

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

51 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here