मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खासगी बस जळून खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे आणि प्रवाशांच्या सामानाचे नुकसान झाले.

 

bus fire
पालघर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खासगी बसला भीषण अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र बससह प्रवाशांचे संपूर्ण साहित्य व सामान जळून खाक झाले आहे.द बर्निंग बसचा थरार मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पाहावयास मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील चिंचपाडा येथे खासगी बसने (एआर. 01.पी. 8484) अचानक पेट घेतला. बसमध्ये काहीतरी बिघाड झाल्याचे व बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यानंतर लगेचच बसमधील सर्व प्रवासी व चालक बसमधून बाहेर पडले.

पाहता पाहता बसला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले व संपूर्ण बस आगीच्या विळख्यात सापडली. खाजगी बस अहमदाबादहून हैदराबादच्या दिशेने जात होती. बसला आग लागली, त्यावेळी बसमध्ये १६ प्रवासी आणि ३ चालक (सहाय्यकांसह) प्रवास करत होते. मात्र वेळीच ते बसमधून बाहेर पडल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने बसला लागलेल्या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसून कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या भीषण आगीत बससह बसमधील प्रवाशांचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here