Bhiwandi Building Collapse: भिवंडीच्या वळगावातील वर्धमान कंपाउंडमध्ये तीन मजली इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग अचानक कोसळून शनिवारी दुपारी झालेल्या भीषण दुर्घटनेमध्ये लहानगीसह तिघांचा मृत्यू झाला. इमारतीच्या ढिगाऱ्यामधून रात्री उशिरापर्यंत नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

 

bhiwandi building
म. टा. प्रतिनिधी, ठाणेः भिवंडी तालुक्यातील कैलासनगर येथील वर्धमान कंपाऊंडमध्ये शनिवारी झालेल्या इमारत दुर्घटनेतून एक महिला आणि तिचा अडीच वर्षांचा मुलगा सुखरूप बचावला. इमारतीचा अर्ध्याहून अधिक भाग दुपारी कोसळला, तेव्हा हे दोघे घरात झोपले होते. मात्र ढिगारा बाजूला करत ही माहिला आपल्या बाळाला घेऊन बाहेर पडली आणि तिने मुलासह स्वत:चाही जीव वाचवला.मूळचे कर्नाटकचे असलेले परमेश्वर कांबळे, त्यांची पत्नी सोनाली आणि अडीच वर्षांचा मुलगा शिवकुमार मागील वर्षभरापासून या दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर भाड्याच्या घरात राहतात. परमेश्वर चालक असून शनिवारी ते कामावर गेले होते, तर पत्नी आणि मुलगा घरी होते. इमारत कोसळल्याचे समजताच तत्काळ ते घटनास्थळी धावत आले.

इमारतीचा भाग कोसळल्यानंतर सोनाली यांनी उशालाच असलेल्या मोबाइलवरून परमेश्वर यांना फोन केला. त्यांनी तिला हिंमत दिली. त्यानुसार सोनाली यांनी मुलाला घेऊन इमारतीच्या ढिगाऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दुसरीकडे त्यांचे पतीशी फोनवर बोलणे सुरूच होते. सोनाली यांनी माती बाजूला केली, लाद्या फोडल्या व अत्यंत छोट्याशा जागेतून मोठ्या जिकरीने त्या मुलाला घेऊन बाहेर पडल्या. या बिकट प्रसंगाची माहिती देताना त्यांना गहिवरून आले होते.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here