म. टा. प्रतिनिधी, : उच्चशिक्षित तरुणीवर पंचकर्म उपचार करण्याच्या बहाण्याने त्याचे चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरला १० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

या प्रकरणी पोलिसांनी सुरेश वडियार (वय ३६, आयुर क्लिनिक, शिवराजनगर, अप्पर इंदिरानगर) या डॉक्टरला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडित तरुणी २२ वर्षांची आहे. वडियार संबंधित तरुणीच्या कुटुंबाचा फॅमिली डॉक्टर होता. त्यामुळे मार्च २०१८पासून ती पाठ व खांद्याच्या दुखापतीच्या उपचारांसाठी वडियारकडे जात होती. बिबवेवाडी येथील अप्पर इंदिरानगर शिवराज नगर येथे सर्वे नंबर १० येथे सुरेश वडियार याचे आयुर नावाचे क्लिनिक आहे. संबंधित तरुणी उपचारांसाठी त्याच्या क्लिनिकमध्ये गेली असता त्याने तिचे चित्रीकरण केले आणि ते सोशल मीडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर वडियारने तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्याच्या अत्याचाराला कंटाळून तिने घडलेला प्रकार घरी सांगितला. तिचे वकील. अॅड हेमंत झंजाड, अॅड. अरविंद खांडरे यांच्यामार्फत पोलिसांकडे फिर्याद दाखल करण्यात आली.

आरोपीला अटक करून कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी डॉक्टरकडून त्यांनी चित्रीकरण केलेले व्हिडियो जप्त करायचे आहेत, ते व्हिडियो स्टोअर केले आहेत का, असल्यास ते सर्व साहित्य जप्त करायचे आहे; तसेच त्यांनी आणखी कोणाची या पद्धतीने फसवणूक केली आहे का, याबाबत तपास करायचा आहे, त्यासाठी त्याची पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी कोर्टात केली. आरोपी विक्षिप्त मनोवृत्तीचा असून, त्याने संबंधित तरुणीचा गैरफायदा घेऊन हे कृत्य केले आहे. त्यामुळे त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद फिर्यादीतर्फे अॅड. हेमंत झंजाड यांनी कोर्टात केला.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here