म. टा. प्रतिनिधी, : जंगलात मध्यरात्री फेकलेल्या आणी विव्हळत पडलेल्या वृद्ध मुकबधीर महिलेचा जीव पोलिसांमुळे बचावला. तीन ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता ही महिला कच्ची घाटी ते पीरवाडीकडे या रस्त्यावरील जंगलातील नाल्यात पडली होती. महिलेला फेकून देणारी बहिणीची सून आणि तिला मदत करणाऱ्या रिक्षाचालकाविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीन ऑगस्ट रोजी रात्री ११च्या सुमासार कच्ची घाटी जवळील जंगलात एक महिला विव्हळत पडली असल्याची माहिती सहाय्यक निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली. त्यानंतर आंधळे यांनी पथकासह घटनास्थळ गाठले. या महिलेची चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता ती मुकबधीर आणि अंध असल्याचे दिसून आले. आंधळे यांनी नागरिकांच्या मदतीने महिलेला तातडीने घाटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.

याप्रकरणी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना माहिती देण्यात आली असता, त्यांनी गंभीर दखल घेत महिलेला टाकून देणाऱ्यांचा शोध घेण्याच्या सूचना सहाय्यक निरीक्षक आंधळे यांना दिल्या. या महिलेचे छायाचित्र घेऊन चिकलठाणा पोलिसांनी आसपासच्या गावांतील परिसर पिंजून काढला. यावेळी ही महिला ब्रीजवाडी, नारेगाव येथील असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी अधिक चौकशी केली असता, या महिलेचा संभाळ तिच्या बहिणीची सून गेल्या आठ ते दहा वर्षांपासून करीत होती, मात्र तिच्या आजारपणाला कंटाळून तिने गल्लीत राहणारा रिक्षाचालक अमीर मुन्नाखान याच्या मदतीने कच्ची घाटी येथील जंगलात सोडल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.

पोलिसांनी या सुनेला आणि अमीर मुन्नाखान याला ताब्यात घेतले असता त्यांनी याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिस नाईक रवींद्र साळवे यांच्या तक्रारीवरून आरोपी सून आणी रिक्षाचालक अमीरविरुद्ध माता, पिता आणि जेष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्यक निरीक्षक आंधळे, जमादार अजिनाथ शेकडे, रवींद्र साळवे आणि सोपान डकले यांनी केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here