जळगाव: राज्यात भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांची युती असली तरी जळगावातील पाचोरा बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे पदाधिकारी अमोल शिंदे यांनी स्वतंत्र चूल मांडली होती. त्यांनी भाजप आणि सेनेच्या किशोर पाटील यांच्या पॅनलला आव्हान दिलं. यात अमोल शिंदे यांच्या शेतकरी सहकार पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. तर, दुसरीकडे किशोर पाटील यांचं पॅनल असो की वैशाली सूर्यवंशी यांचं पॅनल असो कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. अमोल शिंदे यांच्या पॅनलचा विजयी दोन उमेदवारांच्या मतावर पाचोरा बाजार समितीवर कुठल्यातरी एका पॅनलची सत्ता स्थापन होणार असून बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षासोबत बंडखोरी करणारे भाजपचे अमोल शिंदे हे आता किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.

पाचोरा बाजार समिती येथे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनल, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे महाविकास पॅनल तर तर भाजपचे नेते अमोल शिंदे यांचे भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनल अशी तिरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली.

अखेरच्या चेंडूवर चेन्नईच्या हातून सामना निसटला, पाहा मैदानात नेमकं घडलं तरी काय
भाजपचे पदाधिकारी अमोल शिंदे यांचे भाजपप्रणीत शेतकरी सहकार पॅनलने याठिकाणी महाविकास आघाडी आणि किशोर पाटील आणि भाजपच्या पॅनलला आव्हान दिलं होत. सहकार पॅनलचे दोन उमेदवार निवडून आले आहेत. किशोर पाटील यांच्या शेतकरी विकास पॅनलचे नऊ उमेदवार निवडून आले असून त्यांना बहुमताचा आकडा पूर्ण करण्यासाठी एका उमेदवाराची आवश्यकता आहे. त्यामुळे याठिकाणी आता आता भाजपचे बंडखोर अमोल शिंदे हे किंगमेकरच्या भूमिकेत आहेत.

अमोल शिंदे यांचे पॅनलचे उमेदवार कोणाला पाठिंबा देतात, शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांना पाठिंबा देतात की महा विकास आघाडीला पाठिंबा देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. त्यांनतर बहुमत ठरुन पाचोरा बाजार समितीवर कुणाची तरी एकाची सत्ता स्थापन होणार आहे.

Video : स्वाभिमानी कोल्हापूरकर मतदाराची राजकारण्यांना चपराक, मतदानासाठी मिळालेले पैसे मतपेटीत टाकत सुनावलं
याबाबत सहकार पॅनलचे प्रमुख भाजपचे बंडखोर अमोल शिंदे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता, राज्यात युती असली तरी स्थानिक पातळीवर राजकरण हे वेगळं असतं, पक्ष संघटना साठी स्वतंत्र पॅनल बाजार समिती निवडणुकीत उभे केलं. जनतेने जो कौल दिला तो मान्य आहे. आता तो मान्य आहे. आता कोण सोबत जायचे याबाबतचा निर्णय भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन घेतील. त्यांच्या निर्णयानुसार पुढची भूमिका ठरेल असं अमोल शिंदे यांनी बोलताना सांगितलं.
पराभवानंतर चेन्नईच्या संघावर ओढवली १५ वर्षांनंतर मोठी नामुष्की, धोनीची चिंता वाढली कारण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here