चंद्रपूर : राज्यभरात बाजार समित्यांच्या निवडणुकीत मोठे उलटफेर पाहायला मिळाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील १२ बाजार समितींच्या निवडणुका पार पडल्या आहेत. शनिवारी नऊ बाजार समित्यांचा निकाल हाती आला होता. या निकालाने जिल्ह्यातील काही नेत्यांना मोठा धक्का दिला होता. आज जिल्ह्यातील पोंभुर्णा,गोंडपिपरी, भद्रावती या तीन बाजार समितीची मतमोजणी पार पडली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रातील पोंभुर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीने मोठे यश मिळवले आहे. भाजपनं समर्थन दिलेल्या शेतकरी आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना केवळ सहा जागा जिंकता आल्या. तर महाविकास विकास आघाडीनं पाठिंबा दिलेल्या पॅनलला मोठे यश मिळाले आहे. बारा जागांवर विजय मिळवत बाजार समितीची सत्ता त्यांनी काबीज केली आहे. पोभुर्णा येथील पराभव मुनगंटीवार यांच्यासाठी मोठा धक्का असल्याच बोललं जातं आहे.

चंद्रपूर जिल्हातील १२ बाजार समितीसाठी निवडणूका पार पडल्या. नऊ बाजार समितींचा निकाल शनिवारी जाहीर झाला होता. यात चार बाजार समितीवर काँग्रसने विजय मिळावला तर दोन बाजार समितीवर भाजपनं विजय मिळवला होता. दोन ठिकाणी भाजप-काँग्रेस युतीने विजय मिळवला होता.

भाऊ शिंदेंकडे बहीण ठाकरेंच्या साथीला, दोघांच्या भांडणात भाजपचे बंडखोर ठरले किंगमेकर, आता म्हणतात…

आज जिल्हातील पोंभुर्णा, गोंडपिपरी, भद्रावती या तीन बाजार समितीची मतमोजणी झाली. पोंभुर्णा येथील निकाल धक्कादायक ठरला. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे क्षेत्र असलेल्या पोंभुर्णा बाजार समितीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. महाविकास आघाडीनं पाठिंबा दिलेल्या पॅनलला बारा जागांवर विजय मिळाला.

पराभवानंतर चेन्नईच्या संघावर ओढवली १५ वर्षांनंतर मोठी नामुष्की, धोनीची चिंता वाढली कारण…

भाजपचा पाठिंबा असलेल्या पॅनलला केवळ सहा जागांवर विजय मिळवता आला आहे. राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांना बाजार समितीच्या निवडणुकीत अपयश मिळालं होतं.आता मंत्री मुनगंटीवार यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभ असलेल्या पोंभुर्णा येथे मुनगंटीवार यांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, गोंडपिंपरी बाजार समितीत देखील मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. गोंडपिंपरीमध्ये काँग्रेसच्या हातून बाजार समिती भाजपकडे गेली आहे. काँग्रेस नेते सुभाष धोटे यांना मोठा धक्का बसला आहे.

आटपाडीत राडा: बाजार समिती मतदानावेळी गोपीचंद पडळकरांनी ग्रा. पं. सदस्याला कानशिलात लगावली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here