उत्तर प्रदेशः नवरा कामाच्या शोधात परदेशात गेला, बायको गावाला सासू सासऱ्यांसोबत राहत होती. नवरा बाहेरगावी असल्याने पत्नीचं सतत माहेरी येणं-जाणं सुरू होतं. त्याचदरम्यान तिचे माहेरच्या गावातील दोन जणांसोबत सूत जुळलं. सासूला सूनेच्या या प्रेमसंबंधांची कुणकुण लागली. तेव्हा सासूने घेतलेल्या निर्णयाने एकच खळबळ उडाली आहे.उत्तर प्रदेशातील एका महराजगंज येथे एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. तरुणाचे बाजूच्याच गावातील तरुणीसोबत लग्न झाले. लग्नानंतर काहीच दिवसांत युवक नोकरीच्या निमित्ताने सौदी अरबला गेला. पती परदेशात गेल्यानंतर पत्नी एकटी पडली होती. त्यामुळं ती सतत तिच्या माहेरी जायची. त्याचवेळी तिच्या माहेरच्या गावात राहणाऱ्या दोन लोकांसोबत तिचे प्रेमसंबंध निर्माण झाले. महिला त्यांना भेटण्यासाठी सतत माहेरी जाऊ लागली.
अपघातातील जखमींच्या मदतीला पोलिस गेले पण अंधारात दिसलं असं काही की थेट चौघांना बेड्याच ठोकल्या
एकदिवस महिलेने तिच्या दोन्ही प्रियकरांना भेटण्यासाठी सासरच्या घरी बोलवले. ती त्यांच्यासोबत एका खोलीत होती. त्याचवेळी तिची सासूदेखील तिथे आली. खोलीतून तिघांच्या बोलण्याचा आवाज आल्यावर सासूने आत डोकावून पाहिले असता तिच्या पायाखालची जमीनच सरकली. सून दोघां तरुणांसोबत नको त्या अवस्थेत होती. हे पाहताच सासूने खोली बाहेरुन बंद करुन घेतली.

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणार मेट्रो ६, मार्गिकेवर तीन मजली उड्डाणपूलही, अशी असतील स्थानके
सूनेला आणि दोघा तरुणांना खोलीत बंद करुन पोलिसांना फोन केला. पोलिस येताच सासूने त्यांना घडलेली सगळी हकिकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडून सूनेला आणि दोघा तरुणांना ताब्यात घेतलं. घडलेल्या या प्रकाराबाबत पोलिसांनी सांगितलं की, महिलेने तिच्या सूनेविरोधात तक्रार दाखल केली आहे. सुनेचे दोघा तरुणांसोबत अनैतिक संबंध होते, असं तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी अधिक चौकशी केली जात आहे.

मेहुणीसोबत सूत जुळले, अनैतिक संबंधातून मुलीला जन्म, नकोशीला माहीमच्या दर्ग्यात सोडले, पण…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here