मुंबई : शेअर बाजारात भरघोस कमाई करणारे अनेकजण आहेत परंतु प्रत्येकाला नियमित नफा मिळवता येत नाही. ज्यांच्याकडे संयम आहे आणि जे सतत बाजारावर लक्ष ठेवतात त्यांना त्याचा फायदा होतो. परंतु ज्यांना लवकरात लवकर नफा कमवायचा आहे, त्यांच्यासाठी ते खूप जोखिमेचे ठरू शकते. एनएसईच्या नोंदीनुसार बाजारात परतावा देण्याची भरपूर क्षमता असून गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीवर १७ टक्क्यांपर्यंत वार्षिक परतावा मिळवू शकतात. म्हणून योग्य परतावा मिळवण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टींवर लक्ष ठेवा.

अल्पकालीन चढ-उतारांकडे दुर्लक्ष करा
अलीकडे जागतिक अनिश्चितता, बँकिंग संकट, फेड दरात वाढ आणि महागाईच्या भीतीमुळे भारतीय शेअर बाजारात लक्षणीय घसरण झाली. मात्र, दीर्घ काळाचे लक्ष्य ठेवलेल्या गुंतवणूकदारांनी बाजाराच्या या अल्प-मुदतीच्या चढ-उतारांकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही कारण येथे इच्छित परिणाम दर्शविण्यासाठी वेळ लागतो. त्यामुळे अशा वेळी, पोर्टफोलिओ बदलण्याऐवजी गुंतवणूकदारांनी वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ तयार करण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. जे बाजारातील कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकेल.

अंबानींच्या जिओ IPOची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी अपडेट, गुंतवणुकीसाठी तयार राहा!
अस्थिरता स्वीकारा
बाजारातील अस्थिरतेचा तुमच्या पोर्टफोलिओवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. पण परिस्थिती नेहमीच सारखी नसते. बाजारातील अस्थिरता अशा संधी निर्माण करू शकते ज्याचा एक स्मार्ट गुंतवणूकदार लाभ घेऊ शकतो. मात्र, यासाठी तुम्हाला बाजारात दीर्घकाळ टिकून राहावे लागेल.

स्मॉल कॅपमध्ये करा गुंतवणूक
अल्पकालीन अस्थिरता असूनही स्मॉल-कॅप शेअर्सने मिड- आणि लार्ज-कॅप्सपेक्षा दीर्घकाळात चांगला परतावा दिला आहे. स्मॉल-कॅप कंपन्या सामान्यत: सुस्थापित लार्ज-कॅप कंपन्यांच्या तुलनेत लक्षणीय परतावा देतात. जोखीम घेऊ शकतात अशा गुंतवणूकदारांसाठी स्मॉल कॅप गुंतवणूक हा एक चांगला पर्याय आहे. जरी स्मॉल कॅप्समध्ये गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देण्याची क्षमता असली तरी त्यांना दीर्घकाळ टिकवून ठेवणे हा संबंधित जोखीम कमी करण्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

गुंतवणूकदारांचा मौके पे चौका! कंडोम कंपनीचा IPO हाऊसफुल्ल, वाचा सविस्तर
योग्य माहिती घेऊन गुंतवणूक करा
बाजारातून योग्य परतावा मिळवण्यासाठी तुम्हाला योग्य शेअर निवडणे आवश्यक असून त्या शेअर्सशी संबंधित जोखीम आणि शक्यतांची माहिती असणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here