शिरूर, पुणेः शिरूर तालुक्यातील जांबूत येथे चांगरबाबा कृषी पर्यटन केंद्रामध्ये पर्यटनासाठी आलेल्या बाप-लेकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दोघांना वाचवण्यासाठी गेलेल्या आई मात्र मदत मिळाल्याने ती वाचली आहे. मात्र या घटनेने एकच खळबळ उडाली होती. सत्यवान शिवाजी गाजरे ( वय २८) व दिड वर्षाचा मुलगा राजवंश गाजरे ( वय दीड वर्ष) मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर यात शिवाजी गाजरे यांची सून स्नेहल गाजरे ही मदत मिळाल्याने वाचली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, बेल्हे-जेजुरी महामार्गावर जांबूत येथे चारंगबाबा हॉटेल आणि कृषी पर्यटन केंद्र आहे. हे हॉटेल शिवाजी गाजरे यांच्याच मालकीचे आहे. रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास शिवाजी गाजरे त्यांच्या मुलगा सत्यवान आणि पत्नी आणि त्यांचा नातू राजवंश यांना घेऊन पर्यटन केंद्रावर आले होते. येथे परीसरात शेततळे असून सुन व मुलगा कामात असताना राजवंश खेळत खेळत शेततळ्यातमध्ये जाऊन पडला. त्याला वाचविण्यासाठी सत्यवान शेततळ्याकडे धावत जाऊन त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत होते.

सुनेला दोन तरुणांसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं, सासूने केलं असं काही की महिला पुरती अडकली
मात्र त्यांनाही पोहता येत नसल्याने तेही बुडू लागले. ते पाहुन सत्यवान यांची पत्नी स्नेहलनेही पाण्यात उडी टाकली, तिलाही पोहता येत नसल्याने तीही बुडू लागली. त्यावेळी सत्यवानचा भाऊ किरण व वेटर याला आरडाओरडा ऐकू आल्याने तो धावत गेला. त्यामुळं स्नेहलला वाचविण्यात यश आले.

अपघातातील जखमींच्या मदतीला पोलिस गेले पण अंधारात दिसलं असं काही की थेट चौघांना बेड्याच ठोकल्या
सत्यवान व राजवंशला याला शेततळ्यातून वर काढून तात्काळ जांबुत येथे खाजगी दवाखान्यात नेले. तेथुन आळे येथे नेले मात्र दोघांचा मृत्यु झाला होता. त्यांच्यावर रात्री उशीरा जांबुत येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे. गाजरे कुटुंबाच्या मालकीच्या हॉटेल परिसरात ही घटना घडल्याने गाजरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जांबूत परिसरात गाजरे कुटुंब एक प्रतिष्ठित कुटुंब म्हणून ओळखले जाते. मात्र मुलगा आणि नातू गेल्याने त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.

पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणार मेट्रो ६, मार्गिकेवर तीन मजली उड्डाणपूलही, अशी असतील स्थानके

नवनिर्वाचित सरपंचाची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या; भर चौकात आधी रेकी, काहीच मिनिटांत हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here