साहेबगंज : देशात सर्वत्र अवकाळी पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाट आणि धुवांधार पावसामुळे अनेक शहरं संकटात आहेत. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वीज पडून ६ मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला असून तब्बल ६ ते ७ जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना झारखंडच्या साहेबजंग जिल्ह्यात घडली असून यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. काही मुलं आंब्याच्या झाडाखाली उभी होती. अशात अचानक विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला. यावेळी वीज कोसळल्याने ४ मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. अधिक माहितीनुसार, मृत्यू झालेल्या ४ मुलांमध्ये दोघेजण सख्खे भाऊ होते. तर एक १४ वर्षांची मुलगी आयेशा आणि एक १० वर्षांचा मुलगा मृत्यूमुखी पडला. तर इतर गावांतही वीज पडल्याने आणखी दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.१३ वर्षाच्या मुलाचा भयंकर शेवट…पाकुर जिल्ह्यात बिरग्राममध्येही असाच धक्कादायक प्रकार समोर आला. इथे गुरे चरण्यासाठी गेलेल्या अवघ्या १३ वर्षीय तरुणाचा वीज अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला. तर जिल्ह्यातील महेशपूर इथंही वीज कोसळल्याने १६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनांमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून पोलीस घटनेचा तपास करत असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here