काय आहे संपूर्ण प्रकरण?
खरंतर, १० वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने मंगळवारी रात्री फेसबूकवर लाईव्ह केलं होतं. फेसबूक लाईव्ह सुरू असताना त्याने मच्छर मारण्याचे औषध प्यायले. यानंतर तो बेशुद्ध झाला. हा व्हिडिओ नवी दिल्लीच्या तब्बल १२००० किमी लांब असलेल्या कॅलिफोर्नियातील एका ऑफिस टीमने पाहिला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच घाम फुटला. तातडीने याची माहिती भारत सरकारला देण्यात आली. भारत सरकारकडून याची माहिती पुढे युपी सरकारला दिली.
पोलिसांना माहिती मिळताच टीमने आयपी अॅड्रेसवरून विद्यार्थ्यांचं लोकेशन गाठलं. रात्री २ च्या सुमारास पोलीस मुलाच्या लोकेशनवर पोहोचले. यावेळी घरात मुलगा आरामात झोपला असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. यानंतर तपास केला असता असं काही सत्य समोर आलं की पोलीसही चक्रावले. कारण, या विद्यार्थ्याने प्रसिद्ध होण्यासाठी मच्छर मारण्याच्या औषधाच्या बाटलीत पाणी ओतलं होतं. इतकंच नाहीतर यानंतर त्याने बेशुद्ध होण्याचंही नाटक केलं होतं.
व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहलं होतं… Bye Bye All And Miss You….
या विद्यार्थ्याने फेसबूकवर ५२ सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामझ्ये त्याने मच्छर मारण्याच्या बाटलीत पाणी टाकून ते पिण्याचं नाटक केलं. या व्हिडिओच्या कॅप्शनला त्याने लिहलं की ‘Bye Bye All And Miss You…. भावा माझ्या जाण्यानंतर सगळ्यांची काळजी घे’. हे फेसबूक लाईव्ह इतकं व्हायरल झालं की याची खबर थेट अमेरिकेला लागली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असल्याची माहिती आहे.