अजित पवारांच्या मनामध्ये पुढची घडामोडी ठामपणे आहे. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय ते बदलत नाहीत. काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. अजितदादा निर्णय घेतील. दुर्दैवाने एकत्रित सर्वांना वज्रमूठ सभा घ्यावी लागतेय. आमची एकजूट आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. सभा घेऊन जर मत पडत असतील आणि वातावरण बदलत असेल तर हा त्यांचा गैरसमज, असा टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.
चंद्रकांत खैरे महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाला कशाला आले होते? चंद्रकांत खैरे यांनी बकवास बोलणं बंद केलं पाहिजे. थोडं मॅच्युअर व्हायला हवं. चंद्रकांत खैरे यांच्या बोलण्याला पक्षात कवडीची किंमत आणि बाहेर नाही. टावरवर चढून मराठवाड्यासाठी मंत्रिमंडळाची बैठकीसाठी आंदोलनाचा निर्णय घेतलेला चांगला आहे. १७ सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांची कॅबिनेट बैठक व्हायला हवी. आंदोलकांनी केलेली माझी ही आग्रही मागणी असेल. मुख्यमंत्री तातडीने निर्णय घेतील असे मला वाटते, असे शिरसाट म्हणाले.
भाजप किंवा आम्ही मुस्लिमांच्या विरोधात नाही. आम्ही मुस्लिम धर्माच्या विरोधात, हा समज तुमचा चुकीचा आहे. अनेक मुस्लिम तरुणांना इतर देशातील अतिरेकी भडकून देण्याचे काम करतात. लव जीहाद किंवा अतिरिकेच्या माध्यमातून त्यांचा बळी दिला जातो, ते थांबला पाहिजे ही सरकारची भूमिका, मोदी साहेबांनी घेतलेली स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.