तुर्की : जगभरातल्या अनेक विचित्र आणि अनोख्या घटना आपण रोज माध्यमांमधून पाहत असतो. आताही अशीच एक घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. तुम्ही हा फोटो नीट पाहा. यामध्ये एका व्यक्तीने आपल्या डोक्याला एका पिंजऱ्यामध्ये बंद केलं आहे. इतकंच नाही तर या पिंजऱ्याला टाळ्याने बंद करून याची चावी कुटुंबियांना दिल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. अखेर या घटनेची खरी कहाणी समोर आली आहे.खरंतर, ही घटना रशियाची असल्याचं बोललं जात आहे. परंतू हे प्रकरण तुर्कीचं आहे. या व्यक्तीने स्वत:च्या इच्छेने आपलं डोकं पिंजऱ्यामध्ये बंद केलं आहे. हा व्यक्ती तुर्कीच्या इब्राहिम यूकेलमध्ये राहणारा आहे. पण व्यक्तीने आपलं डोकं अशा प्रकारे का बंद केलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. याचं कारण वाचल्यानंतर तुम्हीही डोक्याला हात माराल.
धुम्रपान सोडण्यासाठी तुम्ही लोकांना वेगवेगळे उपाय करताना पाहिलं असेल. हा देखील त्यातलाच एक प्रकार म्हणावा लागेल. स्मोकिंग सोडण्यासाठी या व्यक्तीने आपलं डोकं पिंजऱ्यामध्ये लॉक केलं आहे. हो, आता यामुळे त्याची धुम्रपान करण्याची सवय सुटली की नाही? याबद्दल अद्याप काही माहिती नाही. पण धुम्रपान सोडण्यासाठी वापरलेली ही शक्कल नेटकऱ्यांना भारी आवडली आहे.

तुम्हाला वाचून धक्का बसेल पण या व्यक्तीला २ दशकांपासून धुम्रपान करण्याची सवय होती. तो दिवसाला दोन पॅकेट सिगारेट ओढायचा. ही सवय मोडण्यासाठी त्याने हा खास पिंजरा तयार केला आणि त्यामध्ये स्वत:चं डोकं कैद केलं. हा पिंजरा बनवण्यासाठी त्याने तब्बल १३० फूट लांब तारेचा वापर केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्तीच्या जवळच्या मित्राचा कॅन्सरने मृत्यू झाल्यानंतर त्यानेही अखेर सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याने ही पिंजऱ्याची आयडिया शोधून काढली आणि यासाठी त्याला कुटुंबियांनीही मदत केली. खरंतर, ही घटना खूप जुनी आहे. पण गेल्या काही दिवसांमध्ये सोशल मीडियावर या व्यक्तीचा फोटो पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.