सांगली: ‘कर्नाटकमधील सरकारने मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवला. याबाबत राज्यातील भाजपचे नेते काहीच बोलत नाहीत. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे प्रेम केवळ मतांपुरतेच असल्याचे स्पष्ट होते,’ असा टोला जलसंपदा मंत्री यांनी भाजपला लगावला. तसेच कर्नाटक सरकारने तातडीने मनगुत्ती येथील पुतळा बसवाव, अशी मागणीही पाटील यांनी केली. ते सांगलीत बोलत होते.

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा एका रात्रीत हटवण्यात आला. कर्नाटकातील भाजप सरकारच्या दबावामुळेच पुतळा हटवण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. मनगुत्ती गावातील पुतळा रातोरात हटवण्याचे निषेधार्ह कृत्य कर्नाटकातील भाजप सरकारने केले. मनगुत्ती ग्रामपंचायतीमध्येही भाजपची सत्ता आहे. सरकारच्या दबावानेच हे कृत्य झाले. महाराष्ट्राच्यावतीने आम्ही या कृत्याचा निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भाजपचे प्रेम मतांपुरतेच आहे. यापूर्वीही राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजपची प्रवृत्ती लोकांसमोर आणली होती. खासदार उदयनराजे यांनी संसदेत शपथ घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केल्यानंतरही भाजपचा शिवाजी महाराजांबद्दलचा द्वेष दिसला. भाजपच्या या प्रवृत्तीचा कडक भाषेत निषेध झालाच पाहिजे, असं पाटील म्हणाले.

दरम्यान, मनगुत्ती येथील घटनेच्या विरोधात महाराष्ट्रात शिवप्रेमी रस्त्यावर उतरले आहेत. सीमाभागातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांमध्ये रविवारी अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला. कर्नाटक सरकारने तातडीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवावा, असा आग्रह शिवप्रेमींनी धरला आहे. याबाबत केंद्र सरकारनेही तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या प्रकरणी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. रात्रीच्या अंधारात पुतळा हटवला गेला. या घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. विरोधक या घटनेवर बोलायला तयार नाहीत. चार दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. त्यांचंच सरकार आज कर्नाटकात आहे. हे सरकार शिवाजी महाराजांचा पुतळा हटवते. या घटनेची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घ्यावी. विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावं. वेळ आल्यास विरोधकांच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करावं. आम्ही आंदोलन करायला तयार आहोत, पण विरोधक तयार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here