रत्नागिरीः व नागरिकत्व कायदा रद्द करा असा निषेध करत आम्ही हिंदू-मुस्लिम एक आहोत. अशी घोषणा देत दुपारपर्यंत हजारो नागरिकांनी विराट मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये प्रचंड संख्येने प्रथमच मुस्लिम समुदाय महिला व पुरुषांसह रस्त्यावर आला. रत्नागिरीतील हा पहिला विराट मोर्चा असल्याने लक्षवेधी ठरला होता. या मोर्च्यामध्ये मौलवींसह मुस्लिम व हिंदू नागरिकांची उपस्थिती होती तर खासदार हुसेन दलवाई,, आम. भालचंद्र मुणगेकर, आ. हुसनबानू खलिफे, हाजीफ नदीम सिद्दीकी, कुमार शेट्ये, मिलिंद कीर, तानाजी कुळ्ये, अभिजित हेगशेट्ये,बशीर मुर्तुजा आदींनी समुदायाला मार्गदर्शन केले. मोर्चा अत्यंत शिस्तबध्द व शांततेत झाला. कडेकोट पोलीस निगराणी व बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मौलवींची उपस्थितीही लक्षणीय होती.

जिल्हाभरातून हजारो नागरिक सहभागी झाले होते नेहरू,गांधी,बाबासाहेब आंबेडकर वाला भारत हवा. अशा घोषणा देत नवीन कायद्याचा निषेध करण्यात येत होता. प्रत्येक मुस्लिम नागरिकांनी हातात तिरंगा झेंडा घेत देश हमारा हैं।अशी घोषणाबाजी करत मोर्च्यात सहभागी होते. रत्नागिरीच्या उद्यमनगर येथील चंपक मैदानावरून सकाळी १० वा. मोर्चा निघाला. चर्मालय, गोडबोले स्टॉप , मारुती मंदिर शिवाय पुतळ्याकडून माळनाका मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. दिड कि.मी. लांबीचा मोर्चा असल्याने लक्षवेधी ठरला होता. सर्वधर्मीय लोकांचा सहभाग असल्याने या मोर्च्याबद्दल रत्नागिरीकरांची उत्सुकता मोठी होती. संगमेश्वर, लांजा, रत्नागिरी, तालुक्यातून शेकडोंच्या संख्येने लोक आले होते.

Ratnagiri News in Marathi, रत्नागिरी न्यूज़, Latest Ratnagiri News Headlines

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here