मुंबई: कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला असून ही अत्यंत धक्कादायक आणि निषेधाहार्य बाब आहे. या घटनेची महाराष्ट्र सरकारने दखल घ्यावी. विरोधकांना विश्वासात घ्यावं आणि वेळ आल्यास विरोधाच्या नेतृत्वात बेळगावमध्ये आंदोलन करावं. या घटनेच्या निषेधार्थ आम्ही बेळगावात आंदोलन करायला तयार आहोत, विरोधक तयार आहेत का?, असा सवाल नेते संजय राऊत यांनी केला आहे.

बेळगावातील मणगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. त्यामुळे कर्नाटकात तणाव निर्माण झाला असून या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. रात्रीच्या अंधारात पुतळा हटवला गेला. या घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. विरोधक या घटनेवर बोलायला तयार नाहीत. चार दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. त्यांचंच सरकार आज कर्नाटकात आहे. हे सरकार शिवाजी महाराजांचा पुतळा हटवते. या घटनेची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घ्यावी. विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावं. वेळ आल्यास विरोधकांच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करावं. आम्ही आंदोलन करायला तयार आहोत, पण विरोधक तयार आहेत का? असा सवाल राऊत यांनी केला.

शिवसेनेचे नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटविणे ही चीड आणणारी बाब आहे. अशाप्रकारची हिंमत त्या भागातील नागरिकांची होत असेल तर त्यांना या घटनेची मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा देतानाच या घटनेमागचा बोलविता धनी सर्वांना माहीत आहे. भाजपच्या इशाऱ्यानेच हा प्रकार सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला. तर, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचं भाजपचं प्रेम फक्त मतांपुरतचं असून शिवाजी महाराजांबद्दल भाजपच्या मनात कायमच द्वेष दिसतो, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. भाजपच्या प्रवृत्तीचा निषेध करतानाच कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्ववत बसवण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here