नवी दिल्ली: आयपीएल २०२३मध्ये खेळणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंना पुढील महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल मॅच खेळायची आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी ही लढत इंग्लंडमधील द ओव्हल मैदानावर ७ जूनपासून सुरू होईल. भारतीय संघ सलग दुसऱ्यांचा WTCच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. इतक नाही तर टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार देखील मानली जात आहे. २०११नंतर आयसीसीच्या स्पर्धेचे एकही विजेतेपद न जिंकणाऱ्या भारतासाठी जेतेपद मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे. पण त्याआधी भारताला मोठे झटके बसत आहेत.भारतीय खेळाडू सध्या आयपीएलचा १६वा हंगाम खेळत आहेत. अशात हे खेळाडू सातत्याने जखमी होत आहेत. भारतीय संघासाठी ही लीग इंजरी प्रीमियर लीग झाली आहे. गेल्या दोन दिवसात दोन भारतीय खेळाडूंना दुखापत झाली आहे. ही दुखापत अशी आहे की, संबंधित खेळाडू दिर्घ कालावधीसाठी संघातून बाहेर होऊ शकतात. या शिवाय अन्य दोन असे खेळाडू आहेत जे WTCसाठी फिट दिसत नाहीत.

शर्माजींचा वेगळाच स्वॅग! सेल्फी काढला पण चाहत्याचा iPhone घेऊनच पळाला हिटमॅन रोहित
आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंटस संघाकडून खेळणारे दोन खेळाडूंना एकाच दिवशी दुखापत झाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्धच्या लढतीआधी रविवारी नेट्स मध्ये गोलंदाजीचा सराव करताना जलद गोलंदाज जयदेव उनाडकटला दुखापत झाली. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर मॅच सुरू असताना केएल राहुलला दुखापत झाली. दुखापतीनंतर राहुलला निट चालता देखील येत नव्हते. हे दोन्ही खेळाडू WTCमध्ये भारतीय संघात आहेत.

नादाला लागण्याआधी १० वेळा विचार करायचा; मुंबई इंडियन्सने केला आजवर कधीही न झालेला विक्रम
WTCसाठी ऑलराउंडर म्हणून समावेश करण्यात आलेला शार्दूर ठाकूर देखील जखमी आहे. गेल्या ३ सामन्यांपासून तो संघाबाहेर आहे. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध त्याला फलंदाज म्हणून तिसऱ्या क्रमांकावर खेळवण्यात आले. पण त्याने एकही ओव्हर गोलंदाजी केली नाही. याच बरोबर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणारा उमेश यादवला दुखापत झाली आहे. उमेशला हॅमस्ट्रिंगची दुखापत आहे. WTC फायनलमध्ये उमेश हा भारताचा सर्वात अनुभवी गोलंदाज आहे.

मुंबई इंडियन्सला मिळाली मोठी गुड न्यूज; विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, संघाला नवा…
करोनानंतर आयपीएलमध्ये खेळाडूंना फार कमी प्रवास करावा लागतोय. सर्व लढती ३ ते ४ मैदानावर होत आहेत. या हंगामात पुन्हा होम आणि अवे नियम लागू झाला आहे. त्यामुळे खेळाडूंना सातत्याने प्रवास करावा लागतोय. रात्री उशिरापर्यंत मॅच चालते, ही गोष्ट खेळाडूंच्या दुखापतीला कारणीभूत ठरते. आयपीएलच्या आधी देखील भारतीय खेळाडू सातत्याने सामने खेळत होती. आता खेळाडूंवर याचा परिणाम दिसतोय. WTC फायनलच्या आधी भारतीय संघासाठी ही चांगली गोष्ट नाही. आयपीएलमध्ये अजून ३० साखळी सामने शिल्लक आहेत आणि जखमी खेळाडूंची संख्या वाढू शकते.

क्रिस गेलला एअरपोर्टवर पाहाताच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या, चाहत्यांची सेल्फीसाठी झुंबड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here