पिंपरी: पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने सरपंच पदाचा राजीनामा द्यावा यासाठी १० ते १२ जणांच्या टोळक्याने सरपंच पत्नीच्या पतीला सिमेंटच्या ब्लॉकने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यात पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने माण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ३० एप्रिल २०२३च्या रात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना सुमा माणगाव देवी मंदिरासमोर घडली आहे. याबाबत हिंजवडी पोलिसात १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी रवी बोडके, राज बहिरट, प्रदीप पारखी, सोन्या बोडके, सचिन बोडके यांच्यासह १० ते १२ जणा विरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सचिन मच्छिंद्र आढाव यांनी फिर्याद दिली आहे.

मेट्रो-२ बीच्या चेंबूर स्थानकाचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुटला तिढा
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी सचिन आढाव यांच्या पत्नी या माण गावच्या सरपंच आहेत. त्यांच्या पत्नीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत पतीच्या चारचाकी गाडीवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने सिमेंटचे ब्लॉक मारून नुकसान केले आहे. तसेच सरपंच पत्नीच्या पतीला देखील ब्लॉकने मारहाण केली. तुला जीवे ठार मारतो अशी धमकी देखील दिली आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

उत्पन्नवाढीसाठी ‘बेस्ट’ पाऊल, २६ आगारांचा व्यावसायिक वापर होणार, सल्लागारही नेमणार
या घटनेने फिर्यादीने हिंजवडी पोलिसात धाव घेत पोलिसांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची फिर्याद घेत १० ते १२ जणा विरोधात गुन्हा दखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास हिंजवडी पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेने सुमा माणगाव परिसरात एकच खळबळ उडाली होती.

ऐतिहासिक व अभेद्य सिंधुदुर्गावर साजरा होणार यंदाचा नौदल दिन, पंतप्रधान, राष्ट्रपतीही उपस्थित राहणार

सरपंच प्रवीण गोपाळेंच्या घरी अजितदादांची सांत्वनपर भेट, मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here