लुधियानातील गियासपुरामधील गॅस गळतीत ११ जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये या बाळाचे आई वडील आणि आजी यांचा मृत्यू झाला. काकीकडून त्या बाळाचं संगोपन करण्यात येत आहे. रविवारपासून त्याला काकीनं सांभाळलं आहे. बाळ रडू नये म्हणून दुधाची बाटली त्याच्याकडे देण्यात आली आहे. बाळाला त्यानंतर ताप देखील आला होता, त्यामुळं औषधं देखील देण्यात आली होती. त्या बाळाच्या आई वडिलांचा तीन वर्षांचा संसार अचानक दुर्घटनेत संपला.
या बाळाचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशमधील होतं. या दुर्घटनेतून वाचलेल्या कुटुंबानं आता हे बाळ त्याच्या मावशीसोबत राहील असा निर्णय घेतला आहे. आठ महिन्याच्या बाळाच्या काकांना देखील मोठा धक्का बसला आहे. गॅस गळतीत ते बेशुद्ध पडले होते, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयातून बाहेर पडल्यावर भाऊ त्याची बायको आणि आईचा मृत्यू झाल्याचं त्यांना समजलं.
आठ महिन्यांच्या बाळाविषयी बोलताना ते भावूक झाले होते. माझ्या भावाला या बाळाला चांगल्या प्रकारे वाढवायचं होतं. मोठेपणी या बाळाला पोलीस अधिकारी करायचं त्यांचं स्वप्न होतं. मी माझ्या भावाचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार, पुतण्याला चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करुन त्याच्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं ते म्हणाले.
रविवारी घडलेल्या दुर्घटनेविषयी ते म्हणाले की सकाळी ७ च्या वेळी किराणा मालाच्या दुकानात आम्ही ग्राहकांना साहित्याची विक्री करत होतो. एक महिला तिच्या चेहऱ्यावर ओढणी बांधून आली होती. त्यावेळी गॅस आला आणि यानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं पाणी पिलं आणि त्यानंतर पायऱ्या चढून गेल्यानंतर कोसळलो, असं ते म्हणाले. जमिनीवर कोसळण्यापूर्वी आवाजवर परिणाम झाला होतो, असंही ते म्हणाले. त्यावेळी मी माझ्या चेहऱ्यावर पाणी मारुन घेतलं, असंही त्यांनी सांगितलं.
घाईगडबडीत कर्ज हवं म्हणून अॅपवरून पैसे घेताय? थांबा ! लोन अॅप घोटाळा समजून घ्या