नवी दिल्ली: काँग्रेसला आपली प्रतिमा वाचवण्यासाठी आता पक्षाचा पूर्णवेळ अध्यक्ष निवडावाच लागेल, असे मत काँग्रेसचे खासदार आणि माजी मंत्री यांनी मांडले आहे. काँग्रेस हा दिशाहीन झालेला पक्ष आहे, अशी पक्षाची प्रतिमा बनली आहे. ही प्रतिमा तोडण्यासाठी आता पूर्णवेळ अध्यक्ष निवडणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यांच्यामध्ये पक्षाचे नेतृत्व करण्याची धमक आणि क्षमता असल्याचेही थरूर म्हणाले. मात्र, जर राहुल गांधी यांना अध्यक्ष बनायचे नसेल, तर अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू करायला हवी, असा सल्ला थरूर यांनी दिला आहे.

‘सोनिया गांधींवर भार टाकणे योग्य नाही’

यांना पक्षाचे हंगामी अध्यक्षपद स्वीकारून १ वर्ष पूर्ण होत आहे. राहुल गांधी यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी गेल्या वर्षी १० ऑगस्ट या दिवशी पक्षाची सूत्रे हाती घेतली, असे थरूर म्हणाले. आम्हाला आमच्या नेतृत्वाबाबत स्पष्ट असायला पाहिजे. मी गेल्या वर्षी सोनिया गांधींचे त्या हंगामी अध्यक्ष झाल्याबद्दल मी स्वागत केले होते. मात्र, त्यांनी अनिश्चित काळासाठी अध्यक्ष राहावे, अशी त्यांच्याकडून अपेक्षा करणे योग्य नाही, असे थरूर म्हणाले.

‘लवकरात लवकर निवडला जावा अध्यक्ष’

काँग्रेस पक्ष हा भरकटलेला पक्ष आहे, तसेच तो राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाची भूमिका पार पाडण्यासही सक्षम नाही, अशी काँग्रेस पक्षाची जनतेत झालेली प्रतिमा सुधारणे आवश्यक आहे, असे थरूर म्हणाले. पक्षाला लवकरात लवकर लोकशाही पद्धतीने पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची गरज आहे आणि निवडप्रक्रिया सुरू केली पाहिजे. काँग्रेस पक्षाला संघटनेच्या स्तरावर पुन्हा उभे करू शकेल इतकी शक्ती विजेत्या उमेदवाराला मिळायला हवी, असे थरूर यांनी म्हटले आहे.

वाचा-

राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष बनले तर?

राहुल गांधी यांनाच पुन्हा अध्यक्ष बनवा या मागणी काँग्रेस पक्षात जोर पकडू लागली आहे. जर राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष झाले तर चांगलीच गोष्ट आहे, असे थरूर म्हणाले. जर राहुल गांधी पुन्हा अध्यक्ष बनण्यास तयार असल्यास त्यांना केवळ आपला राजीनामा मागे घ्यावा लागणार आहे. त्याना डिसेंबर २०२२ पर्यंत निवडण्यात आले आहे. मात्र, जर त्यांना पुन्हा अध्यक्ष व्हायचे नसल्यास मग कृती करावी लागेल. माझ्यामते काँग्रेस कार्यकारिणी आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीमुळे पक्षाला अनेक फायदे होतील, असे थरूर म्हणाले.

वाचा- वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here