अयोध्या : पवित्र नगरी अयोध्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका मंदिरात पुजार्‍याचा मृतदेह सापडला आहे. त्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे पुजार्‍याने आत्महत्या करण्याआधी एक व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पोलीस आणि एका हवालदाराचं नाव घेऊन त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुजार्‍याने आपलं जीवन संपवण्याआधी एक व्हिडिओ शूट केला. त्यामध्ये त्याने प्रादेशिक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक आणि एका हवालदारावर खंडणी आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. हे कारण देत पुजार्‍याने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांनीच छळ केल्याचा आरोप समोर आल्यानंतर अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने यावर उत्तर दिलं नाही. तर पोलिसांनी पुजाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Crime Diary: शेतात बाजरी चांगली उगवली पण अचानक आले पोलीस अन्…, पत्नीच्या मृतदेहासोबत पतीचा रक्तरंजित खेळ
ही घटना अयोध्येतील कोतवाली परिसरात असलेल्या रायगंजमध्ये नरसिंह मंदिरात घडली आहे. राम शंकर दास असं आत्महत्या केल्या पुजाऱ्याचं नाव आहे. त्याने आत्महत्या करण्याआधी शूट केलेला व्हिडिओदेखील सध्या माध्यमांवर व्हायरल झाला आहे. तर यावरून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंह मंदिराचे महंत हे जानेवारी महिन्यापासून बेपत्ता आहेत. या प्रकरणात मंदिराचे पुजारी राम शंकर दास यांच्या सहित इतर लोकांवर पोलिसांनी आरोप घेतला असून त्यांची वारंवार चौकशी सुरू आहे. राम शंकर दास यांची चौकशी करून पोलिसांनी छळ केल्याची माहिती आहे. यालाच वैतागून राम शंकर दास यांनी आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं. पण याआधी त्यांनी व्हिडिओ शूट करत आपल्या मृत्यूचं खरं कारण सांगितलं आहे.

Weather Alert: राज्यात पावसाला सुरूवात, पुढचे २४ तास धोक्याचे; मुंबईसह या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदिराचे पुजारी संध्याकाळपासून कोणालाही दिसले नाही. मंदिराचा मुख्य दरवाजा आतमधून बंद होता. त्यामुळे पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पुजाऱ्यांचा मृतदेह कुंठीला अडकल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्यांना मोबाईल आणि शूट केलेला व्हिडिओ हाती लागला. पोलिसांनी सगळे पुरावे ताब्यात घेतले असून आता घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

Crime Diary: हत्येसाठी बायकोने दिली बंदूक, दोघांना लगेच केलं ठार; माजी नगरसेवकाचा थरारक खूनी खेळ

2 COMMENTS

  1. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. or a but thank god, I had no issues. since the received item in a timely matter, they are in new condition. anyway so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    cheap retro jordans https://www.realjordansshoes.com/

  2. Read reviews and was a little hesitant since I had already inputted my order. maybe but thank god, I had no issues. exactly like the received item in a timely matter, they are in new condition. you decide so happy I made the purchase. Will be definitely be purchasing again.
    jordans for cheap https://www.realjordansretro.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here