‘बेळगावातील मणगुत्ती गावातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आला. त्यामुळे कर्नाटकात तणाव निर्माण झाला असून या घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. आशिष शेलार यांनीही एक व्हिडिओ ट्विट करून या घटनेचा निषेध नोंदवला आहे. कर्नाटकातील मनगुत्ती येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटविण्यात आला, याचा आम्ही निषेधच करतो. या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान देशात, कधीही कोणी करता कामा नये, तो आम्ही होऊही देणार नाही. या सगळ्या मागे स्थानिक काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी घेतलेली भूमिका ही थेट आहे, पुतळा हटवण्याची आहे. काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष असलेल्या जारकीहोळी यांच्याविरोधात संजय राऊत तुम्ही आणि शिवसेना आंदोलन करणार का?,’ असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.
वाचाः
‘आंदोलन छत्रपतीसाठी करावं लागलं, तर परवानगीची गरज काय? शिवसेनेला विरोधीपक्ष नेता आणि भाजपच्या परवानगीची गरजच काय? या प्रश्नाचे उत्तरही तुम्हालाच द्यावे लागेल. यांचा पुतळा त्याच ठिकाणी आणि सन्मानाने जसा तहसीलदार आणि पोलीस पाटलांनी सांगितलं, त्याच पद्धतीने झाला पाहिजे. कर्नाटकच्या सरकारला आमची विनंती आहे,’ असं ही ते म्हणाले.
वाचाः
दरम्यान, ‘रात्रीच्या अंधारात पुतळा हटवला गेला. या घटनेचा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. विरोधक या घटनेवर बोलायला तयार नाहीत. चार दिवसांपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला. त्यांचंच सरकार आज कर्नाटकात आहे. हे सरकार शिवाजी महाराजांचा पुतळा हटवते. या घटनेची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घ्यावी. विरोधी पक्षांना विश्वासात घ्यावं. वेळ आल्यास विरोधकांच्या नेतृत्वात बेळगावात आंदोलन करावं. आम्ही आंदोलन करायला तयार आहोत, पण विरोधक तयार आहेत का?’ असा सवाल राऊत यांनी केला होता.
आठ दिवसांत पुतळा बसवणार
कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. राज्यातही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. तर, मणगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी,पंच मंडळी यांची बैठक पार पडली असून आठ दिवसांत एकमेकांच्या सहमतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times